Home विदर्भ घाटंजी येथील पत्रकारांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..!

घाटंजी येथील पत्रकारांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..!

1140

⚫ घाटंजी पं. स. गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांची लेखी तक्रार

घाटंजी – अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी येथील खोटी व बदनामी कारक बातमी प्रकाशित केल्या प्रकरणी गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी संबधित पत्रकांराविरूद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनीष दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे पुढील चौकशी करीत आहे. जिल्हा परिषद सदस्य आशीष सुरेशबाबू लोणकर, जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता मोहन जाधव, जिल्हा परिषद सदस्य सौ. पावणी रुपेश कल्यमवार आणि पंचायत समिती सदस्य अभिषेक शंकरराव ठाकरे व पंचायत समिती सदस्य सौ. नयना जिवन मुद्देलवार यांनी घाटंजी पंचायत समिती कार्यालयात 16 नोव्हेंबर रोजी आवक जावक शाखेत लेखी तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी गट विकास अधिकारी सोनाली माडकर ह्या पीआरसी चौकशी कामी मुंबईत होत्या. विशेषतः तक्रार अर्जावर घाटंजी पंचायत समिती कार्यालयातील पोच असल्याने सबंधित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी तक्रारीची प्रत देउन 15 व्या वित्त आयोगाची दुसरी ई निविदा रद्द करण्याची बातमी प्रकाशित करण्यासाठी अनेक पत्रकारांना विनंती केली होती. तसेच तक्रारीच्या प्रती अनेक पत्रकारांना समक्ष व काहींना व्हाँटस्अँप द्वारे पाठविण्यात आले होते. त्या आधारावर काही घाटंजी येथील बातमीदार व पत्रकारांनी 15 व्या वित्त आयोगाची ई निविदा रद्द करण्या बाबतच्या बातम्या प्रकाशित केल्या आहे. वास्तविक पाहता तक्रार अर्ज व त्यावर पोच असल्याने लोकप्रतिनिधींनी दिलेल्या लेखी तक्रार अर्जा वरुन 15 व्या वित्त आयोगाची दुसरी ई निविदा रद्द करण्याची मागणी पांचही लोकप्रतिनिधींनी केल्याने व त्यावर त्यांची स्वाक्षरी असल्याने वर्तमान पत्रात बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. यात कुठेही कुणाची जाणुन बुजून व हेतुपुरस्सर खोटी बातमी व बदनामी कारक बातमी प्रकाशित करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे अनेक बातमीदार व पत्रकारांनी या पुर्वी घाटंजी पंचायत समितीचे नियमबाह्य कामें, गैरप्रकार व भ्रष्टाचाराच्या बातम्या संबधित गट विकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी व ईतर विभागाचे अधिकारी, संबधित ग्रामपंचायत, ग्रामसेवक आदीं विरोधात बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. संबधित प्रकाशित झालेल्या बातम्यांचे कात्रण सुद्धा मा. ठाणेदाराचे निर्देश असल्यास आम्ही घाटंजी पोलीस स्टेशनला दाखल करु शकतो, असे पत्रकारांचे मत आहे. त्यामुळे गट विकास अधिकारी व पंचायत समिती कार्यालयातील काही भ्रष्ट अधिकारी यांच्या सहकार्याने बातमीदार व पत्रकारांविरुद्ध चिडून जाउन खोटी, बनावट व चुकीची तक्रार दाखल केल्याचे समजते. विशेष म्हणजे 15 व्या वित्त आयोगाची पहीली ई निविदा तांत्रिक, ईतर कारणामुळे रद्द करण्यात आल्याने 15 व्या वित्त आयोगाची दुसरी ई निविदा रद्द करण्याची मागणी, घाटंजी तालुक्यातील भाजपाचे दोन जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना एक जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपा दोन पंचायत समिती सदस्य आदींनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांच्या कडे ई-मेल व आवक जावक कक्षात लेखी तक्रार दाखल केली होती. सदरच्या लेखी तक्रारीवरुन 15 व्या वित्त आयोगाची ई निविदा रद्द करण्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या आहे. बातमी प्रकाशित करतांना बातमीदार व पत्रकारांची कोणतीही चुक नाही. तसेच काही पत्रकारांनी घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सोनाली माडकर व जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे उप विभागीय उप अभियंता अशोक धंबेचा आदींची प्रतिक्रिया सुद्धा प्रकाशित केलेल्या आहे. तरी घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी दाखल केलेली बातमीदार व पत्रकारांविरुद्धची खोटी, बनावट व चुकीची तक्रार रद्द करुन खारीज करण्यात यावे, अशी मागणी घाटंजी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे व घाटंजी तालुका पत्रकार संघटनाचे अध्यक्ष कैलास कोरवते आदींनी केली आहे. तक्रारीच्या प्रती राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यवतमाळ, उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा व तहसीलदार पुजा माटोडे यांच्या कडे पाठविण्यात आल्या आहे. पुढील चौकशी सहाय्यक पोलीस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे हे करीत आहे. सदर तक्रारी मुळे घाटंजी तालुक्यातील बातमीदार व पत्रकारांत खळबळ माजली आहे.
🔵➡️ घाटंजी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे यांची प्रतिक्रिया घेतली असता, गट विकास अधिकारी सोनाली माडकर यांनी घाटंजी पोलीस स्टेशनला दाखल केलेली तक्रार पुर्णत: खोटी असुन सदरची बातमी लेखी तक्रारीच्या आधारावर प्रकाशित करण्यात आली आहे. सदरची तक्रार सुडबुध्दीने, चिडुन जाउन दाखल करण्यात आली आहे. कदाचित एखाद्या पत्रकाराने त्यांची खोटी व बदनामीकारक बातमी प्रकाशित केली असल्यास त्यांनी संबधित पत्रकाराला नियमानुसार भादंवि 499, 500 ची नोटीस देऊन सदर प्रकरण न्यायालयात दाखल करावे, असे त्यांनी बोलतांना सांगितले.