सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा, दि. 26 :- राज्यातील अतिशय गरीब माणसाला अल्प दरात पोषक आहार मिळावा, कुणीही भूकेला राहू नये या उदात्त हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली शिवभोजन योजना राज्यातील उत्कृष्ठ योजना ठरेल असा विश्वास पालकमंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केला.
शिवभोजन योजनेंअतंर्गत जिल्हयाला शासनाने 200 थाळीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. त्यासाठी शिवभोजन जिल्हा समिती मार्फत दोन केद्राची निवड करण्यात आली असून प्रत्येक केद्राला 100 थाळीचे उद्ष्टि देण्यात आले आहे. यामध्ये आनंदी स्वयसहायता महिला बचत गट यांचे सामान्य रुग्णालय परिसरात तर सत्कार भोजनालयाचे वतीने रेल्वे स्टेशन येथे केद्र सुरु करण्यात आहे.
शिवभोजन केंद्रामधून गरीब व गरजु व्यक्तींना 10 रुपयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 मुद भात व 1 वाटी वरण अशी जेवणाची थाळी मिळणार आहे. सदर केंद्र दुपारी 12 ते 2 या कालावधीत कार्यरत राहील. शासकिय कर्मचारी व ज्या ठिकाणी ही योजना सुरु आहे. तेथील आस्थापनेवरील कर्मचा-यांना सवलतीच्या दरात जवेणास सक्त मनाई असणार आहे. शासनाने महाअन्नपूर्ण ॲप विकसित करुन त्यामध्ये ग्राहकाचा फोटो घेण्यात येतो त्यानुसार लाभार्थ्यांने या सुविधेचा लाभ घेतला याची नोंद ठेवण्याची सुविधा या ॲपमध्ये करण्यात आलेली आहे.