पोलीस ही गेले चक्रावून ,
अमीन शाह ,
बायकोचा पैश्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी हतबल झालेल्या नवऱ्याने असं काही केलं की पोलीस ही या मध्ये हादरले. मात्र, पोलिसांनी काही तासातच या नवऱ्याला बेड्या ठोकल्या.
नवऱ्याकडे बायको अनेकदा वेगवेगळ्या गोष्टींचा हट्ट करत असते आणि नवरा हट्ट पुरवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, औरंगाबादमध्ये बायकोचा हट्ट पूर्ण करण्याच्या नादात एका नवऱ्यावर थेट जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. बायकोचा पैश्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी हतबल झालेल्या नवऱ्याने चक्क मंदिरात चोरी केली. मात्र, पोलिसांनी काही तासातच या नवऱ्याला बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद चेलीपुरा भागात राहणारा जावेद जुम्मा पठाण ( वय 30 ) याला सतत त्याची बायको पैसे मागत असे. त्यात काही काम धंदा मिळत नसल्याने जावेद हतबल झाला होता. पण घरी गेलं की बायोकाचा पैश्यासाठी हट्ट व्ह्यायचा. म्हणून पैसे कुठून आणावे या विचारत असलेल्या जावेदनं शहरातील श्री झुलेलाल साई मंदिरातील दान पेटी चोरण्याचे ठरवलं. त्यानुसार शनिवारी मध्यरात्री मंदिराच कुलूप तोडून चांदीच्या दोन मूर्ती आणि दानपेटी चोरून नेली.
विशेष म्हणजे जावेद याने यापूर्वी कधीच कोणताही गुन्हा केला नव्हता. चोरी करताना त्याने अनेक पुरावे सोडले होते. त्यामुळे याच पुराव्यांच्या आधारे सिटी चौक पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या पाच तासात जावेदला बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या जावेदकडून दोन मूर्ती आणि ४ हजार ४६० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे बायकोचा पैशाचा हट्ट पुरवणे जावेदला चांगलचं महागात पडले आहे.