घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना – घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव येथील खंडोबा यात्रेची आज दि. 10/12/2021 रोजी सांगता झाली. शिवणगाव मधील खंडोबा यात्रा प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी पाहायला मिळते. मुंबई, पुणे सह विदर्भातून भक्त येथे दर्शनासाठी येतात. गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात की, 8-9 दशकाच्या आधीपासून यात्रेचे आयोजन होते तसेच खंडोबा आपले रक्षण करतो, या भावनेने दरवर्षी भक्तांची अलोट गर्दी येथे पाहायला मिळते. मंदिर हे दगडी शिळात बांधलेले असून, मंदिरासमोर उंच प्राचीन दीपमाळ आहे. पहिल्या दिवसापासून लोकांनी तळीभंडार उचलण्यासाठी गर्दी केल्याची पाहायला मिळते.
शिवणगाव येथील खंडोबा मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. जेणेकरून मंदिराच्या व गावाच्या सर्वांगीण विकास होईल.
लवकरच सर्व गावकरी मिळून आमच्या गावातील खंडोबा मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. यासाठी लागणारे पोलिस अधीक्षक यांचे उपस्थिती प्रमाणपत्र, मंदिर परिसराचा विकासा बाबत ठराव, वनविभागाचे सदरील मंदिर वनक्षेत्रात येत नसल्याचे प्रमाणपत्र, इ. कागद पत्राची पूर्तता करणे चालू आहे. सर्व कागद पत्रे जमा झाल्यास प्रस्ताव सादर करण्यात येईल. दरवर्षी 1 लाख पेक्षा जास्त भक्त खंडोबा मंदिरास भेट देतात . -सुर्यकांत तौर, मा. सरपंच शिवणगाव