Home बुलडाणा रायरेश्वर किल्यावर झाली रयत क्रांती पक्षाची स्थापना

रायरेश्वर किल्यावर झाली रयत क्रांती पक्षाची स्थापना

584

*छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याची शपथ रायरेश्वर किल्ल्यावरुन घेतली त्याच रायरेश्वर किल्यावर झाली रयत क्रांती पक्षाची स्थापना

*मोजक्याच सहकाऱ्यांच्या सोबत रयत क्रांती पक्षाची स्थापना*

विदर्भातून प्रशांत ढोरे पाटील यांची उपस्थिती

 

पोलीसवाला न्युज ब्युरो ,

रायरेश्वर – शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या मूठभर मावळ्यांच्या सहकार्याने रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली होती त्याच धर्तीवर दि.१२ डिसेंबर रोजी माजी राज्यमंत्री,आमदार सदाभाऊ खोत यांचे सुपुत्र सागर खोत यांनी आपल्या मोजक्याच सहकाऱ्यांच्या सोबत रयत क्रांती पक्षाची स्थापना केली.
संसदीय लोकशाहीमध्येही रयत दुबळी राहिली,पण राज्यकर्ते व प्रशासन म्हणजेच शासन व प्रशासन मात्र गब्बर झाले हे शिवरायांच्या स्वराज्याला अभिप्रेत नव्हते,प्रस्थापित व्यवस्थेत रयतेला अपेक्षित असा शिवरायांच्या स्वराज्यासारखा न्याय मिळाला नाही, म्हणून राजेशाहीत छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे रयतेचे राज्य निर्माण केले,छत्रपती शिवाजी महाराजांची विचार धारा पकडुनच रयत क्रांती संघटनेची स्थापना २१ सप्टेंबर २०१७ रोजी आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे झाली होती गेली चार वर्ष रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या, कामगारांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करत आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे हे करत असताना रस्त्यावरची लढाई करता करता आपला कार्यकर्ता लोकप्रतिनिधी म्हणुन सभाग्रहात देखील गेला पाहिजे जेनेकरुन तो जनतेला अधिक वेगाने न्याय देऊ शकेल म्हणुनच आज रायरेश्वराच्या साक्षीने रयत क्रांती पक्षाची स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रायरेश्वराचे या मंदिरात शंभू महादेवाचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून शपथ घेण्यात आली,छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या गडावरूनच हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या मावळ्यांसह स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे आपल्या मोजक्याच सहकाऱ्यांना व निवडक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रयत क्रांती पक्ष हा भविष्यात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहील, असा विश्वास आजच्या कार्यक्रमामध्ये रयत क्रांती पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला,यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून आपले विश्वासू सहकारी उपस्थित होते,भविष्यात रायरेश्वर येथे घेतलेली शपथ डोळ्यासमोर ठेवूनच रयतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम संघर्ष करु व आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे दहा बारा प्रतिनिधी पाठवूच असे कार्यक्रमात बोलताना अनेक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

यावेळी रयत क्रांती पक्षाचे अध्यक्ष सागर सदाभाऊ खोत यांच्या मातोश्री सुमन सदाभाऊ खोत, दीपक भोसले, लालासो पाटील, शिवनाथ जाधव, एन.डी. चौगुले, दीपक पगार, भानुदास शिंदे, प्रशांत ढोरे पाटील ,निताताई खोत, सिमाताई पवार, सुनिल सदाभाऊ खोत, सौ.मोहिनी सागर खोत यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.