Home बुलडाणा मेरा खुर्द फाट्यावर दोन लाखाचा अवैध गुटखा पकडला .

मेरा खुर्द फाट्यावर दोन लाखाचा अवैध गुटखा पकडला .

452

.

अंढेरा पोलीस पथकाची धाडशी कार्यवाही .

हनिफ शेख 
अंढेरा
, – गुपित माहिती वरुण पोलीस पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना संशयित आरोपीची चार चाकी इंडिका गाडी समोरवरून येतांना दिसून आली .आणि लगेच छापा टाकून गाडी ताब्यात घेतली असता गाडीमध्ये शिलबंद असलेल्या चार बॅग चक्क व इंडिका असा आरोपीकडून दोन लाखा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही घटना १४ डिसेंबर रोजी सकाळी घडली .
अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांना गुप्त बातमी दाराकडून बातमी मिळाली की चिखली वरुण एक इसम दे राजा कडे इंडिका मध्ये अवैधरित्या गुटखा घेवून जाणार आहे . ही माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक , अप्पर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार ,पोहेकॉ कैलास उगले, समाधान झिने, सोनकांबळे, यांना पेट्रोलिंग करण्याच्या निमित्ताने घटनास्थळी पाठविले , आणि गुप्त बातमी दाराकडून मिळालेल्या वर्णनाची संशयित चार चाकी इंडिका चिखली वरुण दे राजा कडे येतांना दिसली , लगेच गाडीला थाबवून तपासणी केली असता इंडिका क्र एम एच ०४, ईक्यू ४०४९ ही गाडी गणेश भास्कर सोनवणे वय २२ वर्ष राहणार भानखेड हा चालवीत होता. सदर गाडीची तपासणी करीत असतांना गाडीमध्ये शिलबंद लहान पांढऱ्या बँग त्यामध्ये एकूण ४३२०० रुपये शासन प्रतिबंधक गुटखा, इंडिका अंदाजे किंमत दिड लाख रुपये,असा एकूण १ लाख ८३ हजार २०० रुपायाचा माल मिळून आला . आणि आरोपी सह जप्त करण्यात आलेला इंडिका गाडी व माल घेवून पोलीस स्टेशनला आणला असता ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार उगले यांनी पोहेकॉ सिद्धार्थ सोनकांबळे यांच्या तक्रारीवरुण आरोपी गणेश भास्कर सोनवणे वय २२ वर्ष राहणार भानखेड तालुका चिखली यांच्या विरुद्ध अप नं.-४१५/२१ कलम ३२७, १८८, २७२ ,२७३, भादवी सह कलम अन्नसुरक्षा मानके कायदा कलम २००६ चे कलम २६(२),(आय),२६(२)(आय व्ही)२७(३)(आय)(२२)३०(२)(अ) शिक्षपात्र कलम ५९ (१)अन्वये गुन्हा दाखल केला आहे . असून
तपास अधिकारी पोउपनि वासाडे यांच्याकडे सोपाविला .यावेळी उपस्थित ठाणेदार गणेश हिवरकर , दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे, पोहेकॉ सिध्दांर्थ सोनकांबळे, कैलास उगले, गजानन वाघ, समाधान झिने,सिरसाट, गजानन दराडे, जोसना गवई, आदी जण हाजर होते.

चालकच झाला मालक ??

आज पकडण्यात आलेल्या गुटख्याच्या साठ्याचा खरा मालक कोण ? हा माल कोणाचा होता कोणाला जात होता याचा तपास होणे गरजेचे आहे जो आरोपी दाखविण्यात आला आहे तो एक गरीब चालक आहे या परकरणात सखोल तपास करून खऱ्या सुत्रधारास गजाआड करणे गरजेचे आहे ,