Home विदर्भ Yavatmal Dist. हॉकी असोसिएशनच्या सहा खेळाडू विद्यापीठ संघात

Yavatmal Dist. हॉकी असोसिएशनच्या सहा खेळाडू विद्यापीठ संघात

299

यवतमाळ –  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती च्या शारीरिक शिक्षण विभागाने 2021-22 या सत्रा करिता विद्यापीठाचा महिला हॉकी संघ जाहिर केला. या संघात यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनच्या तब्बल पाच हॉकीपटू ची निवड करण्यात आली आहे.
शिल्पा इंदल राठोड,रुपाली यादव तिरपुड़े,शीतल शंकर जाधव, समीक्षा विलास खंडारे,मोनिका ज्ञानेश्वर नागोसे,स्वामिनी अजय कुलकर्णी हे निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. सर्व खेळाडू जिल्हा हॉकी असोसिएशन चे खेळाडू असून अभ्यंकर कन्या शाळेच्या क्रीडांगणावर असलेल्या आकाश चिकटे हॉकी अकादमीत नियमित सराव करतात.
निवड झालेले खेळाडू 26 ते 30 डिसेंबर दरम्यान जीवाजी यूनिवर्सिटी ग्वालियर( मध्यप्रदेश )येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत अमरावती विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या खेळाडूंना यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनचे सचिव तथा मार्गदर्शक शाहेद सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ प्रकाश नांदुरकर, सहसचिव देवेन चपेरिया, क्रीडाशिक्षक अविनाश जोशी यांनी कौतुक केले आहे.