पर्यायी जागा त्वरीत मिळाली नाही तर गुरुदेव युवा संघ आंदोलन छेडणार
प्रतीनिधी / यवतमाळ – गेल्या दोन वर्षापुर्वी पिंपळगाव-वाघापूर-लोहारा बायपास च्या मार्गसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पिंपळगांव येथील तीन घर .हटविण्यात आले होते. त्यावेळी शासनाकडून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देतो असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले होते. आता दोन वर्ष उलटूनही त्या बेघर नागरीकांना प्रशासनाकडून कुठलीच मदत झाली नाही. ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत लहान घरे बांधून राहत असून कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांना नागरीकांना दिनांक 18 डिसेंबर 21 रोजी अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या बेघर नागरीकांनी आज गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देवून पर्यायी जागेची व्यवस्था होई पर्यंत आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समितीत राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली.
र्पिंपळगाव वाघापूर लोहारा बायपास हा रोड तयार कर्यात आला. परंतु रोड बनवण्याकरता तीन कुटूंबाचे घर अडचणीचे होते. परंतु बांधकाम विभाग यांनी पर्यायी जागा देतो म्हणून तिन कुटुंबाला आश्वासन दिले होते. परंतु दोन वर्षे उलटूनही त्यांना पर्यायी जागा मिळाली नाही. त्या तीन कुटुंबात वीस जणांचा परीवार राहत आहे. त्यात लहान मुलं, वृध्द नागरीक राहत असल्याने त्यांना पर्यायी जागा त्वरीत देण्यात यावी याकरता आज रोजी गुरुदेव युवा संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी तसेच बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या गोरगरीब जनतेचे हातावर आणून पानावर खाणे असा आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कडून आलेल्या नोटीसमुळे हे नागरीक बेघर होणार नाही यांची प्रशासनाने दखल घ्यावी. गेल्या वर्षी वन, भूकंप , पुनर्वसन विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 14,10,2020 पत्र देण्यात आले. परंतु अद्याप पर्यंत उठलीच कारवाई करण्यात आली नाही. यामुळे या तीन कुटुंबाला बेघर व्हावे लागलं का असा प्रश्न पडला आहे. आज रोजी जगताप उपविभागीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आज आता जागा उपलब्ध नाही परंतु काही दिवसात आम्ही पर्यायी जागा उपलब्ध करुन देवू असे आश्वासन दिले. यावेळी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी त्वरित पर्यायी जागा द्या नाही तर अन्नत्याग आंदोलन बांधकाम विभागासमाेर करणार असल्याचा इशारा यावेळी दिला. निवेदन सादर करते वेळी शोभा तुकाराम भिवनकर, विजय अशोक निरडवार, संजय काशिनाथ राउत उपस्थित होते.