🔵➡️ टेनिस बाँल क्रिकेट सामन्यात 32 संघ सहभागी होणार..?
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील रामनगर येथे 26 डिसेंबर 2021 पासुन टेनिस बाँल क्रिकेटचे ग्रामीण सामने आयोजित करण्यात आले आहे. सदरच्या क्रिकेट सामन्यात प्रथम पारितोषिक 11 हजार 111 रुपये रोख नवयुवक दुर्गा मंडळातर्फे, द्वितीय पारितोषिक 9 हजार 999 रुपये रोख नवयुवक बाल गणेश मंडळातर्फे, तृतीय पारितोषिक 7 हजार 777 रुपये रोख हरिकृष्णा फर्निचर मार्ट तथा हरिकृष्णा मंगल कार्यालयतर्फे, चतुर्थ पारितोषिक 5 हजार 555 रुपये रोख लक्ष्मी किराणा व गोपाल किराणातर्फे देण्यात येणार आहे. क्रिकेट सामन्याची प्रवेश फी स्विकारण्यासाठी प्रविण चौधरी (Mob : 7719009122) व सुरज सोनुले
(Mob : 8888918783) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वराज्य क्रिकेट क्लबचे अध्यक्ष श्रीकांत चौधरी यांनी केले आहे.
➡️ रविवारी रामनगर येथे टेनिस बाँल क्रिकेट सामन्याचे उदघाटन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) विनोद चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वघारा टाकळीचे सरपंच गजानन गाऊत्रे, पोलीस शिपाई राहुल राठोड, ग्रामपंचायत सदस्य बजरंग येनगुनवार, देवराव भेंडारे आदीं मान्यवर उपस्थित होते.
➡️ रामनगर येथील क्रिकेट सामन्यात मांडवी, पारवा, कोठारी, चिखलवर्धा, कुर्ली, करंजी, सावरगांव, पळशी, आमडी, पंगडी ईत्यादी जवळपास 32 चे वर क्रिकेट संघ सहभागी होणार असल्याची माहिती प्रविण चौधरी यांनी दिली.
➡️ बक्षीस वितरण दिनेश सब्बनवार, गणेश पलीकोंडावार, अनुप अप्पनवार, किसन तालेवार यांच्या हस्ते होणार आहे. क्रिकेट सामन्याचे पंच म्हणून प्रविण चौधरी, अविनाश चौधरी, उत्तम घौधरी, रविंद्र चौधरी, प्रेमानंद चौधरी आदीं काम पाहणार आहे.
(⚫ टिप :- रामनगर हे गांव घाटंजी तालुक्यात असुन पारवा ते पिंपळखुटी मार्गावर आहे.)