Home विदर्भ “आधार फासे पारधी” संस्थेस धान्य देवून दिले आधार पोलीस मिञ परीवार समन्वय...

“आधार फासे पारधी” संस्थेस धान्य देवून दिले आधार पोलीस मिञ परीवार समन्वय समितीचा स्तूतं उपक्रम..!

319

बाबाराव इंगोले – तालुका प्रतिनीधी धामणगांव रेल्वे 

अमरावती येथिल संस्थेच्या अध्यक्षा निलीमाताई पवार ह्या गरीब , निराधार पारध्यांच्या मुलांना तसेच गुन्हेगारी क्षेत्रातून वळवून त्यांचे समूदेशन करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणन्याचे काम निलीमाताई बरेच दिवसापासून सातत्याने करीत आहे .

राजूरा येथिल पारधी बेढ्यातील गरीब , निराधार मुलांना एकञ करून त्यांना शिकण्यासाठीचे व माणुसकीचे जीने जगण्याचे धडे देत आहे . सोबतच मुलांना मध्यांतरी जेवण पण देतात , काल त्यांचा पोलीस मिञ परीवार समन्वय समिती अमरावती पदाधिकाऱ्यांना फोन आला की , माझ्या मुलांना जेवणा करीता काहीच धान्य नाही , करीता आपण आम्हास तातडीने मदत करावी . याची पोलीस मिञ परीवार समन्वय समिती अमरावती पदाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेवून त्वरित पोलीस मिञ परीवार समन्वय समितीचे भातकूली तालुकाध्यक्ष कुंदन गजभिये यांनी आपल्या मुलांचा जन्मदिवस साजरा न करता त्या गरीब , निराधार मुलांच्या भोजनांच्या व्यवस्थेसाठी त्या मुलांन करीता प्रत्यक्षात त्या ठीकाणी जावून धान्य भेट दिले व त्यांची परीस्थिती जाणून घेतली . यावेळी प्रदेश सल्लागार मा . सुभाषजी सोळंके , मनिष गुडदे विभागीय प्रमूख , कैलास विंचूरकर अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र तांबेकर अमरावती जिल्हा महासचिव , कुंदन गजभिये तालुकाध्यक्ष भातकूली यांच्या प्रमुख उपस्थितीत ” आधार फासे पारधी ” या संस्थेस धान्य भेट दिले. या प्रसंगी आपल्या संस्थेस काही अडचण आल्यास व मदत लागल्यास पोलीस मिञ परीवार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा . पोलीस मिञ परीवार समन्वय समिती महा.राज्य सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील .असे मनोगत प्रदेश सल्लागार मा . सुभाषजी सोळंके सर यांनी व्यक्त केले . ” आधार फासे पारधी संस्थेच्या ” सर्वश्री निलीमाताई पवार यांनी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले . समितीने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतक केले जात आहे .