Home नांदेड प्रफुल्ल राठोड व संध्याताई राठोड यांच्या मध्यस्थीने रुपला नाईक तांडा येथील उपोषण...

प्रफुल्ल राठोड व संध्याताई राठोड यांच्या मध्यस्थीने रुपला नाईक तांडा येथील उपोषण मागे.

384

मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर दि.२७ :- माहूर तालुक्यातील रूपला नाईक तांडा येथील घरकुल योजने अंतर्गतच्या नऊ कुटुंबांचे घरकुल यादितील नावे वगळण्यात आल्यामुळे दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी सोमवार पासून ग्रा.प. कार्यालय रुपला नाईक तांडा येथे सुरु केलेले सहकुटूंब उपोषण आश्वासना नंतर मागे घेण्यात आले.


आमरण उपोषणार्थीमध्ये भोला दत्तसिंग पवार, यशवंत चव्हाण, बाबूसिंग राठोड, उल्हास जाधव, दिगंबर राठोड, हिरासिंग राठोड, नथू राठोड, टेकसिंग पवार, रमेश राठोड व नरेंद्र राठोड यांचा समावेश होता.
माहूर – किनवट परिसराचे लोकनेते प्रफुल राठोड व प्रदेश भाजपा कार्यकारणी सदस्या संध्याताई राठोड यांनी उपोषण स्थळी जाऊन उपोषण कर्त्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर माहूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यासोबत भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. तसेच ग्रामसेविका नरवाडे यांनी उपोषणकरत्या सर्व कुटुंबांचा घरकुल यादीमध्ये समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर प्रफुल्ल राठोड व संध्याताई राठोड यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले.
यावेळी पंचायत समिती सभापती कदम, सरपंच जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख सुदर्शन नाईक व गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.