Home बुलडाणा साखरखेर्डा ठाणेदार जितेंद्र आडोळे एक्शन मोड मध्ये ???

साखरखेर्डा ठाणेदार जितेंद्र आडोळे एक्शन मोड मध्ये ???

359

अवैध धंदयावर साखरखेर्डा ठाणेदार जितेंद्र आडोळे यांची नजर ,

शहर व परिसरातील अवैध दारू ,ताडी , राशन माल तस्करी वरली मटका जुगार अड्डे गुटखा माफिया गुटका विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांवर
कडक कारवाई करणार ,

 भगवानराव साळवे

सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात चोरी छुपे सुरू असलेल्या सर्व अवैध धंदे शंभर टक्के बंद करण्याचा विडा संकल्प ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी उचलला असून या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात कुठेही वरली चक्री मटका अवैध दारू ताडी राशन माल तसेच गुटका विक्री आदी अवैध धंदे सुरू असलयास त्याची गैर नाही त्यासाठी अश्या अवैध धंद्या वर कडक कारवाई करण्यासाठी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी कडक वॉच ठेवला असून कुठेही चोरी छुपे अवैध धंदे सुरू असेल तर त्याच्या विरोधात मग तो कितीही मोठा अवैध धंदे वाला असो त्याला सोडणार नाही त्याच्या विरोधात कडक कारवाई करणार असल्याचे ठाणेदार आडोळे यांनी सांगितले असून त्या संदर्भात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे दरम्यान कुठेही लपून छपून अवैध धंदे सुरू असेल तर माझ्या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क करावा असे आवाहन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी जनतेला केले आहे त्यामुळे अवैध धंदेवाल्या मध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे
साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र डोळे अवैध धंद्यावाल्या चे कर्दनकाळ ठरणार आहेत साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत संपूर्ण अवैध धंदे बंद करण्यात आले आहे तरी देखील काही ठिकाणी काही जण चोरीछुपे वरली मटका दारू ताडी तसेच गुटख्याचा अवैध कारोबर करीत असल्याचे माहिती मिळाली असून अशा अवैध धंद्यावर टाच आणण्याचा संकल्प ठाणेदार आडोळे आणि त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केला आहे त्यासाठी वरली मटका चक्री चोरून-लपून जी सुरू आहेत तसेच अवैध गुटका विक्री सुरु आहे त्यांच्यावर धाडी मारून कडक कारवाई करणार आहेत तसेच अवैध गुटखा विक्री जर सूर्य असेल तर संबंधित विकणारे व्यापारी दुकानदार आणि पानटपऱ्यावर देखील धाडी मारणार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करनार आहे ठाणेदार आडोळे यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे जर कुठे अवैध धंदे सुरू असेल तर त्याची माहिती माझा मोबाईल क्रमांक 9403109720 यावर द्यावी संबंधित माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध धंद्यावर वर कठोर कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी सांगितल्याने अवैध धंद्या वाल्या मध्ये प्रचंड दहशत पसरली आहे मात्र लपून छपून सुरू असलेले अवैध धंदे बंद होणार असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये आनंद व्यक्त होत आहे ,

 

ठाणेदार जितेंद्र आडोळे ,