– आर्णी – केळापूर विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष स्वानंद अशोक चव्हाण.
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी / यवतमाळ – आर्णी केळापूर मतदार संघातील आदिवासी, दलीत, वडार, पारधी व इतर श्रमिक असंघटित कामगारांना संघटित करण्याचा हेतूने यवतमाळ जिल्ह्यातील युवकांचे आशास्थान स्वानंद भाऊ अशोक चव्हाण (आर्णी – केळापूर विधानसभा अध्यक्ष तथा अध्यक्ष घाटंजी तालुका युवक काँग्रेस) यांनी एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने पहील्या प्रयत्नात आर्णी – केळापुर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात ई – श्रम कार्ड नोंदणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
➡️ देशात श्रमिकांची संख्या वाढत चाललेली आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असे काही उपाय करणे गरजेचे असतांना, सरकार नावाला योजना चालू करून देते परंतु प्रत्यक्षात त्याचा फायदा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार काही उपाय योजना करत नाही. या योजनेच्या माध्यमातून कार्ड धारकास दर महा 3 हजार रुपये पेन्शन मिळेल, अपघात अथवा अपंगत्व झाल्यास 2 लाख रूपये मदत, महामारी झाल्यास राज्य शासनाकडून आर्थिक मदत, मुलांना स्कॉलरशिप या शिवाय अशा विविध सरकारी योजनेचा लाभ मिळेल. म्हणून खरोखर जनतेपर्यंत याचा फायदा पोहचवण्यासाठी घाटंजी तालुका युवक काँग्रेस कमेटी तर्फे आगामी काळात गांव तिथे ई – श्रम कार्ड नोंदणी नोंदणी शिबिर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले असून आर्णी – केळापूर मतदार संघात एकही कामगार नोंदणी पासून वंचित राहू नये यासाठी ई – श्रम कार्ड नोंदणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून आगामी काळात अशा युवक काँग्रेसच्या नेतृत्वा मधुन असेच कार्य घडो, हीच जनमानसाची भावना असल्याचे आर्णी – केळापूर युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष स्वानंद अशोक चव्हाण सांगितले आहे.