रावेर( शेख शरीफ)
रावेर शहरा लगत उभारण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुल याचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे . या तालुका क्रीडा संकुल येथे बास्केट बॉल या खेळाचे मैदान उभारण्यात यावे अशी मागणी शहरातील क्रीडाशिक्षकां तर्फे करण्यात आली.
याबाबत सविस्तर असे की, रावेर यावल मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या प्रयत्नांनी रावेर तालुक्यासाठी प्रथमच तालुका क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. तालुका क्रीडा संकुल येथे नवनवीन खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी रावेर व परिसराचे नावलौकिक करावे. याकरिता आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या तर्फे क्रीडा शिक्षकांकडून काही मागणी असल्यास त्या मागणीचे हि आवाहन करण्यात आले होते. रावेर शहरातील सरदार जी जी हायस्कूल येथील मुख्याध्यापक शिरीष वाणी, क्रीडा शिक्षक व उपमुख्याध्यापक टी बी महाजन, क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक ई जे महाजन, श्री एस पी पाटील व क्रीडा शिक्षक श्री जे के पाटील, क्रीडाशिक्षक युवराज माळी, क्रिडाशिक्षक अजय महाजन यांनी आमदार शिरीष दादा चौधरी यांची भेट घेऊन तालुका क्रिडा संकुल येथे बास्केटबॉल खेळाचे मैदान उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी क्रीडाशिक्षक युवराज माळी, प्रतिक खराले, क्रीडा शिक्षक जयेश बिरपन, वाय एस महाजन, भरत कुंवर उपस्थित होते. तसेच आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार निवेदनानुसार बास्केटबॉल मैदानाच्या मागणीची माहिती माननीय तहसीलदार रावेर, तालुका क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.
*चौकट*
शिरीष दादा यांनी दिले मैदान पूर्ततेच्या आवाहन
तालुका क्रिडा संकुल येथे बास्केटबॉलचे मैदानाची मागणी करण्यात आल्यानंतर लगेच आमदार शिरीष दादा चौधरी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.