मनोज गोरे
चंद्रपुर , दि. २७ :- कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील इंदीरा प्रवीण काकडे ३५ वर्षीय महिलेने बाखर्डी येथील शेतशिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सदर महिलेला कॅन्सर असून पोटाच्या आजाराने त्रासल्याने आत्महत्या झाल्याची चर्चा होत आहे. बाखर्डी येथील इंदिरा प्रवीण काकडे वय ३५ या सकाळी ७ वाजता शौचालयाला बाखर्डी शेतशिवारातील रमेश जुलमे यांच्या शेतात गेल्या असता खूपच वेळ झाला तरी घरी परत न आल्याने इकडे तिकडे शोध घेतला असता त्यांना शेतातील विहिरीजवळ चप्पल व शौचालय डब्बा आढळून आल्याने विहीरीत आत्महत्या केल्याचे लक्षात आल्याने खळबळ उडाली.
यावेळी परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने इंदिरा प्रवीण काकडे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला घटनेची माहिती गडचांदूर शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली त्यानंतर गडचांदूर पोलिस निरीक्षक गोपाल भारती यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी तात्काळ दाखल झाले व घटनास्थळाची पाहणी केली व प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले असून पुढील तपास सहायक फौजदार शकील अन्सारी पोलिस जमादार सुनील मेश्राम पाहत आहे.