Home वाशिम ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संसदेत मांडणार – खासदार रामदास तडस

ग्रामीण पत्रकारांच्या समस्या संसदेत मांडणार – खासदार रामदास तडस

847

पत्रकार संरक्षण समितीचे पत्रकार दिनाचे आयोजन

वर्धा – ग्रामीणधी भागातील पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतात. त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न , त्यांना शासकीय योजनानेचा लाभ मिळण्यासाठी त्यांच्या समस्या संसदेत मांडू असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यानी पत्रकार दिनी सत्कार समारंभ कार्यक्रमात केले.

पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सत्कार समारंभ द हेरिटेज सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस होते.
कार्यक्रमास कामगार नेते यशवंत झाडे,पत्रकार प्रशांत देशमुख, ग्रामगीताचार्य गंगाधर जगताप, पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे, अमरावती जिल्हाध्यक्ष संघापल उमरे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष विजय मालखेडे , महेश ढवळे सह जेष्ठ पञकार अश्विन सव्वालाखे , वर्धा कार्याध्यक्ष सत्तार शेख , जिल्हाध्यक्ष रविराज घुमे, जिल्हा सचिव योगेश काबंळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना खा. तडस म्हणाले की ग्रामिण पत्रकारांच्या समस्या शासनाकडे मांडल्या जातील. अन्य जिल्ह्याप्रमाणे वर्धेतही पत्रकार भवन झाले पाहिजे. पत्रकारांनी नवीन आणि जुनी संसद भवन पाहण्यासाठी अभ्यास दौरा करु , अशी ग्वाही खासदार तडस यांनी दिली.
यशवंत झाडे बोलताना म्हणाले, पत्रकारिता ही विस्वाहर्या आहे. आजही वृत्तपत्र वाचणारा वर्ग असुन ग्रामीण भागातील पत्रकार सुंदर बातम्या लिहून समाजाच्या प्रश्न जणतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असल्याचे वास्तव आहे.
यावेळी प्रशांत देशमुख, विनोद पत्रे , यानी विचार व्यक्त केले.
उत्कृष्ठ पत्रकार विशाल कट्टोजवार वर्धा , दिलीप पिंपळे सेलू, प्रदीपचंद्र कुलकर्णी समुद्र्पुर, आनंद छाजड , सिंदी रेल्वे, निखिल लाड आष्टी, विनोद घोडे देवळी, महेंद्र जुगणाके खरांगना मोरांगना आश्विन सव्वालाखे यवतमाळ, धामणगाव व सामाजीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. व्ही. वंजारी, प्राध्यापक सचिन सावरकर , ग्रामीण साहित्यीक नारायण जारुंडे यांना शाल,व सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रविराज घुमे यानी केले. संचालन संदीप रघाटाटे, पंकज गाडगे यानी केले, मोहन सुरकार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता संजय धोंगडे, प्रशांत आजनकर, बाळा चतारे, गणेश शेंडे, गजानन जिकार, दिपक चौधरी, बाळासाहेब वाघ, विनोद महाजन, गजानन गारघाटे, अवधूत शेंद्रे, रवि साखरे , राजु वाटाणे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला जिल्हयातील ग्रामीण भागातील पञकार उपस्थित होते.