Home मराठवाडा मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर-फाउंडेशन च यशस्वी पाचवं वर्ष

मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर-फाउंडेशन च यशस्वी पाचवं वर्ष

145

रवि गायकवाड

औरंगाबात , दि. २७ :- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्व. कचरू पा शिंदे (दादा) यांच्या स्मरणार्थ धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी मोफत नेत्ररोग निदान तपासणी व शस्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात येते त्याच प्रमाणे हे यशस्वी पाचवे(५) वर्षे पूर्ण झाले. या शिबिरास परिसरातील खेडे व गावं तांड्या वस्त्यावरील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होतेे , धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात, सालाबादप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले होते, या शिबिर प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज पा पेरे,तंटा मुक्ती अध्यक्ष श्री.बन्सीदादा हिवाळे,दामुआण्णा डुबे,डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ गणेश पा शिंदे,मा.जि.सरपंच अशोक धर्मे,डॉ. सुनील कुलकर्णी,डॉ.मिलिंद कोनार्डे, डॉ. अंताराम धरपळे,ग्रा प सदस्य अमोल वंजारे,किरण गुजर,वामनदादा साठे, सागर फरताळे,उत्तम धर्मे, ज्ञानेश्वर औटी, युवासेना विभाग प्रमुख काकासाहेब टेके,डॉ शशिकांत टेकाडे,डॉ त्रिम्बक पाडळकर,सुनिल धुत,रामेश्वर घोडके,डॉ दीपक गायकवाड,दिपक मोरे सर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.या शिबिरास लायन्स क्लब औरंगाबाद यांच्या कडून डॉ संदीप गायकवाड, प्रभाकर काळे,यांनी रुग्णांची तपासणी करून माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले या शिबिरात 378 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली व 29 रुग्ण मोतीबिंदू शस्रक्रिया करण्याकरिता लायन्स क्लब नेत्रालय औरंगाबाद या ठिकाणी बोलवण्यात आले,या शिबिरास विशाल हाडे, कृष्णा कावरे, दिनेश चव्हाण, मुश्ताक सय्यद,उमेश शिंदे, सोमनाथ पंडित, सुभाष हिवाळे, गणेश जाधव, मनोज मुंडलिक,भगवान देवा जोशी व गजानन पॅरामेडीकल कॉलेज चे विद्यार्थी ,आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.