इकबाल शेख – वर्धा
आर्वी :- अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने केलेल्या शारीरिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या मुलीच्या गर्भपाता संबंधी दोषी असलेल्यानामांकित डॉ. व दोन इतरांवर गुन्हा दाखल करून स्री रोग तझ डॉक्टर रेखा कदम व आरोपी किशोर सहारे,नलू सहारे यांना पोलिसांनी अटक केली.
सविस्तर वृत्त असे की सहा महिन्यापूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी नित्यक्रम करण्याकरता गेली असता विधी ग्रस्त बालकाने जबरदस्तीने शारीरिक संबंध केले व त्यानंतर दोन-तीन वेळा शारीरिक संबंध ठेवले.यातच ती गर्भवती राहिली , पोटात दुखत असल्यामुळे पीडितेच्या आईने मुलीची विचारणा केली असता मुलीने झालेला प्रकार कथन केला. आरोपीने पीडितेचा कुटुंबाला सांगितले कोणतीही तक्रार करू नका आम्ही उपचार व पुढील खर्च करण्यास तयार आहे व आरोपीने पीडित याला डॉक्टर रेखा कदम यांच्या दवाखान्यात उपचाराकरता नेले असता डॉक्टर कदम यांनी मुलगी अल्पवयीन असून पाच महिन्याचा गर्भ असल्यामुळे गर्भपातासाठी तीस हजार रुपयाची मागणी केली व त्यानुसार आरोपीने 30000 भरून गर्भपात केला.
अल्पवयीन मुलीची प्रकृती खालावत असल्यामुळे स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली व त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई करून पास्को कायदा व विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलीस निरीक्षक श्री भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनाखालीपोलिस उप निरीक्षक जोस्ना गिरी व चमु पुढील तपास करीत आहे