Home नांदेड ग्रामीण मातीतील चित्रांचा जादुगार रणजित वर्मा भाजपा च्या वतीने सत्कार.

ग्रामीण मातीतील चित्रांचा जादुगार रणजित वर्मा भाजपा च्या वतीने सत्कार.

455

प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड

नांदेड/माहूर,दि : १० :- माहूर शहरातील प्रसिद्ध चित्रकार तथा शिक्षक रणजित दत्त वर्मा यांचा भाजपा तालुका माहूर च्या वतीने भाजपा कार्यालयात सत्कार करण्यात आला.

प्रसिद्ध चित्रकार रणजित वर्मा यांनी आपल्या केलेच्या माध्यमातून सुमारे 150 विविध चित्र रेखाटले असून त्या माध्यमातून माहूर शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले आहे.या ग्रामीण भागातील चित्रकाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्र प्रदर्शनात सहभाग नोंदवला.या प्रदर्शनात सादर केलेल्या चित्र कलेची दखल घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांनी राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त केला.त्यामुळे माहूर तालुक्याचे नाव जगभर प्रसिद्ध झाले असून ही बाब माहुर करांसाठी अभिमानास्पद आहे.

त्यांच्या स्तुब्ध उपक्रमाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी तालुका माहुर च्या वतीने भाजपा चे अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा हिंदु धर्मरक्षा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष योगी श्याम भारती महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन चित्रकार रणजित वर्मा यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले यानी रणजित वर्मा यांनी मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले.यावेळी भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, किनवट माहूर विधान सभा संयोजक अँड. रमण जायभाये, शहराध्यक्ष गोपुभाऊ महामुने, सामाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे,नीलकंठ मस्के, जीवन अग्रवाल, कैलास फड, संजय पेंदोर, शेख बाबू, संतोष वर्मा, पत्रकार राजू दराडे, नागोराव सुर्वे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. दिनेश येऊतकर यांनी तर आभार कैलाश फड यांनी मानले.