Home बुलडाणा देऊळगाव माळी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

देऊळगाव माळी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

488

देऊळगाव माळी – कैलास  राऊत

दि. १२ :-  येथील तरुण शेतकरी रामेश्वर उर्फ मनोहर उद्धव तायडे वय वर्ष 34 राहणार देऊळगाव माळी यांचे दिनांक 12 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता चायगांव शिवारातील अरूण भिमराव लोढे रा.मोहदरी यांच्या शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. स्वताच्या शेतातील हरभरा फवारण्यासाठी पाणी काढत असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे ते विहिरीत पडून पुन्हा पाण्याच्या वर आलेच नाही त्या वेळी घटनास्थळी त्यांची पत्नी अर्चना यांनी आरडाओरडा करून परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला परंतु सुमारे एक तास पाण्यात शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला , पोलीस पंचनामा केला त्यांच्या पश्चात त्यांना एक बारा वर्षाचा मुलगा पत्नी आई भाऊ भावजय असा बराच मोठा आप्तपरिवार आहे मनोहर तायडे यांच्या जाण्यामुळे देऊळगाव माळी गावावर शोककळा पसरली असून मनोहर हा अतिशय प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे तो सर्वांच्या आवडीचा होता सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे