Home महत्वाची बातमी नांदेड जिल्ह्यात 474 व्यक्ती कोरोना बाधित , “35 कोरोना बाधित झाले बरे”

नांदेड जिल्ह्यात 474 व्यक्ती कोरोना बाधित , “35 कोरोना बाधित झाले बरे”

499

महेन्द्र गायकवाड‌ 

नांदेड – जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 17 अहवालापैकी 474 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 435 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 789 एवढी झाली असून यातील 88 हजार 26 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 108 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 328, नांदेड ग्रामीण 23, अर्धापूर 5, देगलूर 9, हदगाव 1, हिमायतनगर 1, कंधार 14, किनवट 1, लोहा 17, मुदखेड 2, मुखेड 11, नायगाव 1, उमरी 1,  परभणी 5, अकोला 2, अहमदनगर 1,हिंगोली 7, पुणे 1, अमरावती 1, वाशीम 1,  पंजाब 2, उत्तराखंड 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 18, बिलोली 6, देगलूर 1, हदगाव 4, किनवट 3, मुदखेड 4, मुखेड 1, नायगाव 1, लातूर 1 असे  एकुण 474 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 29, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  
 
आज 1 हजार 108 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 205, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 853,  खाजगी रुग्णालय 10 अशा एकुण 1 हजार 108 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
*जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती*.
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 10 हजार 455
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 4 हजार 838
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 789
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 26
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.90 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-13
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-45
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 108
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4 कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.