Home राष्ट्रीय आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित कला कुंभ विविधतेतील एकतेच्या भावनेला प्रतिबिंबित...

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित कला कुंभ विविधतेतील एकतेच्या भावनेला प्रतिबिंबित करतो

332

2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा ही 750 मीटरची दहा रेखाचित्रे अविभाज्य घटक असतील

नवी दिल्ली, 14 जानेवारी – नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली येथे आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कला -कुंभ हा सोहळा  विविध कलाकारांच्या कार्यशाळांसह साजरा केला गेला, ज्यात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अनाम वीरांच्या शौर्याच्या कथांचे प्रतिनिधित्व करणारी अंदाजे 750 मीटर आकाराची भव्य रेखाचित्रे साकारण्यात आली. सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय यांच्यातील एक अद्वितीय सहकार्य दर्शविणाऱ्या या भव्य कलाकृती, 2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा अविभाज्य घटक असतील. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक अद्वैत गरनायक यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अद्वैत गरनायक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, ही रेखाचित्रे देशाच्या विविध भौगोलिक स्थानांवरील विविध प्रकारच्या कलांचे प्रदर्शन करत राष्ट्रीय अभिमान आणि श्रेष्ठत्व व्यक्त करण्याचे साधन म्हणून कलेचे असलेले  सामर्थ्य सिद्ध करतील. “एक भारत श्रेष्ठ भारत’ याचे खरे मर्म या कार्यशाळांमधून दिसून आले, तसेच भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील वीरांच्या जीवन आणि संघर्षांचे चित्रण करताना आपल्या देशाच्या सांस्कृतिक पैलूंमधील  समृद्ध विविधता दिसून आली. ओडिशा आणि चंदीगड या दोन ठिकाणच्या पाचशेहून अधिक कलाकारांनी यांवर परिश्रमपूर्वक संशोधन केले आहे आणि ते उत्साहाने रंगवले आहेत,” असे ते पुढे म्हणाले.

गरनायक म्हणाले, “नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली यांनी भारतातील एकता आणि विविधतेचे खरे मर्म दर्शवण्यासाठी देशातील विविध प्रकारच्या दृश्य आणि दृश्यकलांचे एकत्रीकरण करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन केले आहे. मला विश्वास आहे, की राजपथवर प्रदर्शित केल्या जाणाऱ्या विशाल रेखाचित्रांमुळे प्रत्येक व्यक्तीला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अनाम वीरांच्या इतिहासाबद्दल जिज्ञासा निर्माण होईल आणि भारताच्या आधुनिक, स्वदेशी आणि समकालीन कलांच्या एकत्रित दृश्य पैलूंकडे लक्ष वेधले जाईल.

गरनायक पुढे म्हणाले की, सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रमुख कार्यक्रमाअंतर्गत या कार्यशाळांमधून सहकार्य आणि सामूहिक कार्याचे पैलू दिसून आले आहेत. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्ली यांनी ओडिशा येथील, कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत आणि भुवनेश्वरमधील सिलिकॉन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोबत 11 ते 17 डिसेंबर रोजी आणि चंदीगड येथील चित्कारा विद्यापीठासोबत 25 डिसेंबर 2021 ते 2 जानेवारी 2022 दरम्यान सहकार्य करून या कार्यशाळांचे आयोजन  केले होते.

कला कुंभ- आझादी का अमृत महोत्सव हा विविधतेतील एकतेच्या भावनेला प्रतिबिंबित करतो त्याचबरोबर भारत सरकारच्या प्रगतीची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी आणि तेथील लोकांचा, संस्कृतीचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरे करण्याच्या उपक्रमाचे विलोभनीय दर्शन घडवितो.  “या कार्यशाळांमध्ये साकारलेली रेखाचित्रे भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक अस्मितेच्या प्रगतीशील अशा सर्व पैलूंचे मूर्त स्वरूप म्हणून पाहिले जाऊ शकतात ज्याला नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे  (NGMA ) महासंचालक, अद्वैत गरनायक, यांच्या कलात्मक दृष्टीचे  आणि प्रख्यात ज्येष्ठ कलाकारांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पुढील टप्प्यात, 2022 च्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी ही रेखाचित्रे राजपथ येथे कलात्मक रीतीने  प्रदर्शित केली जातील. ही चित्रे सर्व नागरिकांसाठी मोक्याच्या जागी खुली गॅलरी म्हणून ठेवली जातील आणि लोकांना खऱ्या अर्थाने समृद्ध राष्ट्रीय वारसा आणि परंपरा या साठी प्रेरित करतील.