Home नांदेड राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त विविध स्पर्धांचे आयोजन

384

महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्हा् प्रशासनाकडुन राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यातत आलेल्या विविध स्पर्धेत जिल्हयातील शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, नागरिकांनी व नवमतदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हााधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाकडून राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोविड-19 या महामारीच्याू संदर्भात केंद्र व राज्य् सरकारकडुन निर्धारीत केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन यावर्षीचा राष्ट्रीय मतदार दिन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्या त येणार आहे.

यामध्ये इयत्ता नववी ते बारावी व पदवी, पदव्युत्तर वयोगटातील तसेच सर्व खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी / महिला/ नागरिकासाठी लोकशाही आकाशकंदील बनविणे व भित्तीपत्रक तयार करणे इ. स्पकर्धा घेण्या त येणार आहे. या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धकांनी (विद्यार्थी) आकाशकंदील/ भित्तीपत्रक तयार करून 19 जानेवारी पर्यंत आपले शाळा महाविद्यालयात अथवा तालुक्यासतील संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत 20 जानेवारी पर्यंत जमा करावे. खुल्या गटातील स्पर्धक महिला / नागरिक यांनीही तयार केलेले आकाशकंदील / भित्तीरपत्रक इ. संबंधित तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेत 20 जानेवारी पर्यंत जमा करावे. उक्तव प्राप्तर विजेत्या‍मधुन तालुकास्तिरावर प्रत्ये क गटातून प्रथम/व्दितीय विजेते निवड करण्याात येतील.

स्पेर्धेचे निकष / नियम :
लोकशाही आकाश कंदील
 लोकशाही आकाश कंदीलावर निवडणूक विषयी – मतदानप्रक्रीया ,लोकशाही, मतदार नोंदणी /जागृती इ. बाबत संदेश/घेाषवाक्यड / लोगो/चित्र असणे बंधनकारक राहील..
 स्पदर्धक लोकशाही आकाश कंदील त्यां ना हवा त्या आकाराचा बनवू शकतील, आकाराचे बंधन राहणार नाही.
 यासाठी लागणारे साहित्यक – आकाश कंदील तयार करण्याासाठी पर्यावरणपूरक साहित्याशचा वापर केला जावा. डिझायनिंग करण्यायसाठीचे रंग/रंगीत पेपर/जिलेटिन पेपर/तसेच इतर साहित्यल स्पार्धकांनी स्व्त: आणून घरी लोकशाही आकाश कंदील तयार करावायाचा आहे.
भित्तीरपत्रक –
 भित्तीोपत्रकाचा आकार Regular Drawing Sheet (Emperor size) च्या/ आकाराचा असावा.
 भित्तीोपत्रावर चित्रे /लिखीत मजकूर लिहीता अथवा चिकटवता येईल./ परंतु निवडणूक विषयी – मतदानप्रक्रीया ,लोकशाही, मतदार जागृती इ. बाबत संदेश/घेाषवाक्यय असणे बंधनकारक राहील.
 भित्तीपत्रकावर निवडणूक विषयक – लोकशाही, मतदार नोंदणी व मताधिकार याबाबतचे लोगो/चित्र ही काढता येईल.

तसेच गाणी लोकशाहीची मतदान अधिकाराची ही संकल्पना घेऊन एक नवीन गीतरचना तयार करुन त्याचे जास्तीत जास्त चार मिनिटांचा व्हीडिओ बनवून (संगीत, नृत्य नेपथ्यासह) टेलीग्राम 9284453899 वर दिनांक 23 जानेवारी पर्यंत पाठवायचे आहेत.