Home विदर्भ “Big News” – जुगार अड्ड्यांना अभय कुणाचे?

“Big News” – जुगार अड्ड्यांना अभय कुणाचे?

323

इकबाल शेख.

घोगरा परिसरात एका व्यक्तीच्याच शेतामध्ये जुगाराचा अड्डा सुरू आहे,

जलालखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या जुगार अड्यावर पोलिस आयुक्तांनीच कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे . जुगाराचे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

तिसऱ्या लाटेत घातक ठरलेल्या व्हेरियंटचा महाराष्ट्रात कहर तरीही लोहारी सावंगा पासून पाच ते सहा की. मी. अंतरावर जलाल खेडा पोलीस सशन अंतर्गत घोगरा येथे एका व्यक्तीच्याच शेतात मध्ये जुगाराचा अड्डा सुरू आहे, या जुगार सुरु असल्याने यावर पोलिस आयुक्तांनीच कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

लोकवस्तीत जुगाराचे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. एकीकडे शहरातील जुगार अड्डे उद््ध्वस्त करण्याचे काम पोलिस आयुक्तांनी जोमाने हाती घेतले असताना नागपूर जिल्यातील या जलालखेडा परिसरातील लोकवस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या घोगरा येथे शेतात जुगार खेळणाऱ्यांची खास व्यवस्था बंडू नामक व्यक्तीने केली आहे. यात पोलिसांच्या सहमतीनेच जुगार अड्डा चालवत असल्याचे बोलले जात आहे. क्रमश…..