Home जळगाव वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्यात तीन शाखा फलकाचे उद्घाटन…!

वंचित बहुजन आघाडी रावेर तालुक्यात तीन शाखा फलकाचे उद्घाटन…!

123

रावेर (शेख शरीफ)

रावेर तालुका येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने रावेर तालुक्यातील रावेर शहर, शिंदखेडा ,वाघोदा बु. या तीन गावामध्ये शाखा फलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोदभाऊ सोनवणे यांच्या हस्ते दि.17 जानेवारी सोमवार रोजी करण्यात आले.


उद्धाटन करते वेळी जिल्हाध्यक्ष म्हणाले की, बहुजन ह्दय सम्राट श्रेध्दय बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकर याचे आदेशानुसार वंचित समाजाला व बहुजन समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळु शिरतुरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्व समाविष्ट समाजाचा पक्ष असुन बहुजन व वंचित समाजाने जास्ती जास्त वंचित बहुजन आघाडी या पक्षात प्रवेश करावा असे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे म्हणाले.
शाखा उद्घाटन प्रसंगी वंचित उपजिल्हाध्यक्ष रफिक बेग, भुसावळचे देवदत्त मकासरे (मेजर) रावेर तालुका उपाध्यक्ष सलिम शाह ता.उपाध्यक्ष सुरेश अटकाळे ता. सचिव अर्जुन वाघ ता.उपाध्यक्ष विनोद तायडे ता.सचिव कंदरसिंग बारेला, दौलत अढांगळे, भिमसिंग बारेला, शिंदखेडा शाखा अध्यक्ष राहुल तायडे संपुर्ण शाखा कार्यकरणी रावेर शाखा अध्यक्ष सुरेश बारेला संपुर्ण शाखा कार्यकारणी वाघोदा बु.शाखा अध्यक्ष सागर इंगळे व संपुर्ण शाखा कार्यकारणी सर्व वंचित बहुजन आघाडीचे महिला पुरुष कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.