Home नांदेड श्री रेणुकादेवी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ग्रंथालय विभागाच्या वतीने ऐतिहासिक ग्रंथ...

श्री रेणुकादेवी महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ग्रंथालय विभागाच्या वतीने ऐतिहासिक ग्रंथ प्रदर्शन

100

प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड

नांदेड/माहूर,दि,१७ :- श्रीक्षेत्र माहूर येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने व बळीराम पाटील यांच्या ४९ व्या पुण्यथितीनिमीत्त . ‘ऐतिहासिक ग्रंथांची प्रदर्शनी ‘ दि. १७ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आली. या ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन प्राचार्य डॉ एन जे एम रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, व देशभक्तांच्या जीवनावर आधारित ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले. बंजारा समाजाच्या वास्तविक जीवनाचे रेखांकन करणा-या प्रथम इतिहासकार बळीराम हीरामण राठोड पाटील लिखित ‘गोर बंजारा समाजाचा इतिहास’ या ग्रंथाचा ही समावेश होता.
या ग्रंथप्रदर्शनीस प्राध्यापक वृंदांनी कोविड नियमांचे पालन करीत उपस्थिती दर्शविली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड व सचिव सौ संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे ग्रंथापाल, डॉ. काशिनाथ राठोड आयोजन केले या वेळी ग्रंथप्रदर्शनीस डॉ. राजेंद्र लोणे, डॉ. दत्ता जाधव, डॉ. इकबाल खान, डॉ. धरमसिंग जाधव, डॉ. संदिप जाधव, डॉ. दिनेश व्हिजीगिरी, डॉ. अरविंद हारकळ, प्रा. विजयपाल वाढवे, प्रा. अनिल दोंदे, प्रा. बालाजी कोलपवार, प्रा. गजानन झुंझारे,अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य,बाबासाहेब राठोड , विवेकानंद पेरलावार, चिलावर,शेख खलील,शंकर राठोड , रणजित राठोड,राठोड,राहुल पवार, अविनाश आडे,यांनी उपस्थित होते.