लक्ष्मण बिलोरे- घनसावंगी, जालना
परमात्मा शिव ज्योती स्वरूप आहे, ब्रह्माबाबांच्याद्वारे शिवपरमात्माने या विश्वाला शांतिस्वरूप बनण्यासाठी संदेश दिला आहे.असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी दीपा बहेन यांनी केले.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीज् ईश्वरिय विश्व विद्यालयाच्या उपकेंद्रामध्ये ब्रह्माबाबांचा स्मृतिदिन आणि पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती उत्सव साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रजापिता ब्रह्माबाबा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर, न्यूज जालनाचे संपादक रामेश्वर लोया, घनसावंगी तालुकाध्यक्ष किशोर शिंदे,सकाळचे बातमीदार राजकुमार वायदळ,प्रभात न्यूजचे गणेश ओझा, लोक 24 न्यूजचे अजय गाडे, दैनिक महाभारतचे जालना जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण बिलोरे आदींची उपस्थिती होती.ब्रह्माबाबांचा स्मृतिदिन आणि बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असा दुग्धशर्करा योग आल्याने सर्व सन्माननीय पत्रकार ब्रह्माकुमारीज् दीपा बहेन यांचे अमृततुल्य वाणीतून विचार ऐकण्यासाठी तासभर स्तब्ध झाले होते.त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांचा आदर सत्कार करण्यात आला.प्रभुप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.