Home नांदेड धर्माबाद येथे देवगिरीच्या भरोसे तहसील कार्यालय सह सर्व कार्यालय उघडतात

धर्माबाद येथे देवगिरीच्या भरोसे तहसील कार्यालय सह सर्व कार्यालय उघडतात

454

धर्माबाद: ता.प्रतिनिधी राहुल वाघमारे

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला असला तरी कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नाहीत.धर्माबाद तालुक्यातील पंचायत समिती, बांधकाम विभाग, नगर परिषद गट शिक्षण विभाग सह सर्वच कार्यालयांमध्ये तुरळक कर्मचारी वगळता, अनेक जण नांदेड सह जिल्ह्यावरुन दररोज देवगिरी एक्सप्रेसने ये-जा करतात तर सकाळी अनेक कर्मचारी हे देवगिरीच्याच वेळानेच कार्यालयाला उपस्थित राहतात. कधी देवगिरी धर्माबाद ला साडेदहा तर कधी अकरा वाजता धर्माबाद ला येते तर नांदेडला परत जाण्यासाठी सर्व कर्मचारी लोक हे कार्यालयातील काम अर्धवट सोडून तीन वाजेपर्यंत च कार्यालयात उपस्थित राहतात. जर आपण तिनं वाजता धर्माबाद रेल्वे स्थानक येथे सर्व कार्यालयातील कर्मचारी दिसून येतात.राज्यातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार राज्यातील शासकीय कार्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्यात आला. शासनाने कर्मचाऱ्यांना दररोजच्या कामकाजात ४५ मिनिटांचा वेळ वाढविला असून सकाळी नऊ पंचेचाळीस ते सायंकाळी साडेसहा यावेळेत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. शनिवार रविवार कर्मचाऱ्यांनी आनंदात सुटीचा मजा लुटली. परंतू हे कर्मचारी सोमवारी कार्यालयात येण्याची वेळ मात्र विसरले. तरी याकडे जिल्हा अधीकारी यांनी लक्ष देऊन जे अधीकारी कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नाही त्या लोकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.