Home मुंबई मुंबईत ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीतील जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त…!

मुंबईत ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीतील जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त…!

127

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत ताडदेव येथे इमारतीला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत मृतांच्या कुटुबियांचे सांत्वन केले आहे आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.

या आगीत ज्यांचे मृत्यू झाले आहेत त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्यासही त्यांनी मंजुरी दिली आहे. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येतील.

पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहेः

“मुंबईत ताडदेव इथं इमारतीला लागलेल्या आगीचे वृत्त ऐकताच दुःख झाले. या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांकडे शोकभावना व्यक्त करतो आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना करतो- पंतप्रधान नरेंद्र मोदी”

“मुंबईत ताडदेव इथल्या इमारतीमध्ये लागलेल्या आगीत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्यात येतील- पंतप्रधान नरेंद्र मोदी”

 

 

Previous articleरुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा – पराग पिंगळे
Next articlePM condoles the deaths in the building fire at Tardeo, Mumbai
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.