जलगांव:(एजाज़ गुलाब शाह)
आपला महान भारत देश, भारतीय संस्कृती व संविधान हे अत्यंत चांगले व संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक व आदर्श असून सर्वसमावेशक आहे. परंतु काही मूठभर समाजकंटक धर्माधर्मात तेढ निर्माण करुन वारंवार याला छेद देत असतात.
भारतीय संस्कृती व संविधानाला अनुसरून हवा असलेला समाज निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता, शांती व बंधुभाव अबाधित राहून समाजात एकोपा व देशभक्ती कायम राहण्यासाठी सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येत समाजाला संबोधित करून मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे सै. नियाज अली भैय्या फौंडेशन ने यासाठी पुढाकार घेत सर्व धर्मीय धर्मगुरूंना एका व्यासपीठावर आणून यशस्वी सुरुवात करण्यासाठी पैगाम – ए – अमन ( शांतीचा संदेश) या कार्यक्रमाचे आयोजन 23 जनवरी 2022 रविवार रोजी भिलपुरा चौकातून केला
या कार्यक्रमाचे उद्घाटन शांतीचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या शुभ्र कबूतर सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते आकाशात उडवून करण्यात आले. आलेल्या सर्व धर्मगुरूंचे व प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सै. अयाज अली यांनी केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भवानी मंदिर चे धर्मगुरू श्री. पंडित महेश कुमार त्रीपाठी, सुन्नी जामा मस्जिद चे मौलाना जाबीर रजा अमजदी, गुरुद्वारा गुरु सिंग सभा चे ग्यानी गुरुप्रीत सिंग, सेंट अलायन्स चर्च चे फादर सुमसिंग आर्य, भन्ते संघनायक बौद्ध धर्मगुरू पूज्य भन्ते संघनायक यन सुगंत वंत जी महाथेरो, सै. अयाज अली, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे दीपक जोशी, मौलाना नौशाद साबरी, अस्सलाम बाबा अशरफी यांनी आप आपल्या धर्मग्रंथात मानवता, शांती, बंधुभाव व देशभक्ती याविषयी काय लिहिलेले आहे ? यावर प्रकाश टाकत उपस्थित नागरिकांना महत्वपूर्ण, मोलाचे मार्गदर्शन करून एक आदर्श देशभक्त, एक आदर्श धर्म अनुयायी, एक आदर्श मानव म्हणून काय करायला हवे तसेच काय करू नये याविषयी सांगितले. धर्मग्रंथातील श्लोक म्हणत त्याचे अनुवाद करून लोकांना मंत्रमुग्ध केले. सदर कार्यक्रम हा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा झालेला असून आज पासून तर 26 जानेवारी पर्यंत सतत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.
याप्रसंगी सै. नियाज अली भैय्या फॉउंडेशन चे सै. अयाज अली, डॉ. परिमल मुझुमदार, नारायण वाणी, योगेश मराठे, मनोज कपश्प, सुरज गुप्ता, मुकेश परदेशी, शेख शफी, हाजी सलीम उद्दीन, बन्सी सामंथा, नंदकुमार वाणी, नितीन शिंपी, शेख नजीर उद्दीन, जावेद बागवान, यांसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली