रावेर ( शेख शरीफ)
याबाबत सविस्तर वृत्त असे की राष्ट्रीय विश्व गामि पत्रकार संघ नागपूर जिल्हाध्यक्ष तथा दैनिक देशोन्नती चे पत्रकार श्री सतीश भालेराव यांना हिंगणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक. बळीराम परदेशी यांनी जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली तसेच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील काळी दौलत खान येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील पुसद येथील धाडसी पत्रकार यांच्यावर तीस ते चाळीस गाव गुंडांनी प्राणघातक हल्ला केला व पत्रकारांच्या जवळील वृत्तांकन साठी अंदाजे 80 हजार रुपये किमतीचे सामान लुटून नेले त्याचा निषेध करत रावेर येथे तहसील येथे निवेदन देण्यात आले त्यावेळी रावेर तालुका अध्यक्ष योगेश पाटील. ईश्वर महाजन शाकीर शेख प्रदीप महाराज पंजाबी. राहुल जैन संतोष कोसुर्दे जयंत गांगवे महेश चंद्र लोखंडे इत्यादी पत्रकार उपस्थित होते