देऊळगाव माळी (प्रतिनिधी कैलास राऊत)
दि. ०१ :- संजीवनी युवक कल्याण,शैक्षणिक व क्रीड़ा प्रसारक मंडल , डोणगांव संजीवनी परिवार च्या 23 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिना दरवर्षी संजीवनी पुरस्कार देऊन गौरविन्यात येते .यंदाच्या सन 2022 च्या सामाजिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षापासून विविध उपक्रम कार्यक्रमाने राष्ट्रीय पातळीवर दखल घेतले गलेले दे माळी गावचे भूमिपुत्र युवा सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र गवई यांना दि 30 जानेवारी 2022 रोजी राजुरकर मंगल कार्यालय डोणगांव येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात “संजीवनी पुरस्कार 2022” मान्यवरांच्या उपस्थितित सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता दिलुभाई शाह तर प्रमुख अतिथी म्हणून जि .प. अध्यक्षा सौ मनिषाताई पवार जि. प. सभापती राजेन्द्र पळसकर महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष प्रमोद बापु देशमुख काँग्रेसचे जेष्ट नेते नाझीमभाई कुरेशी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष गजानन चनेवार यांची प्रमुख उपस्थिति होती .कार्यक्रम प्रास्ताविक,संजीवनी परिवाराचे अध्यक्ष डॉ गजानन उल्हामाले यांनी केले.सदर सामाजिक कार्याचा संजीवनी पुरस्कार 2022 गजेंद्र गवई यांना बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मनीषा ताई पवार यांचे शुभ हस्ते व जिल्हा परिषद कृषि सभापति राजेन्द्र पलस्कर यांचे सह अनेक मान्यवराच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार चे स्वरूप सन्मान पत्र,स्मृतिचिन्ह,शाल श्रीफल असे असून याप्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना मनोगता मध्ये गजेंद्र गवई यांनी गेल्या 30 वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली . यापूर्वी गजेंद्र गवई यांना जिल्हा ,राज्य, राष्ट्रीय स्तरावरिल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ज्या मध्ये भारत सरकार च्या नेहरू युवा केन्द्रा चा 2 वेळेस जिल्हा युवा पुरस्कार, उत्कृष्ठ राष्ट्रीय सेवा कर्मी पुरस्कार, सांस्कृतिक क्षेत्रातील जनजागृति स्वाभिमान गौरव पुरस्कार,समाज भूषण पुरस्कार, पत्रकारीतेचा राज्यस्तरीय परिवर्तन पुरस्कार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आम्बेडकर मुकनायक पुरस्कार,पाणी फाउंडेशन पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावर डॉ बाबासाहेब आम्बेडकर फेलोशिप , नई दिल्ली, संविधान प्रचार कार्याचा नॅशनल डिग्निटी अवॉर्ड , नई दिल्ली यासारखे शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत, पुरस्कार हे कार्याची दखल व पावती असतात तसेच प्रेरणा देतात असे मत व्यक्त केले . कार्यक्रमाचे संचालन हमीद मुल्लाजी यांनी केले तर आभार सुरेन्दसिंह चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश वाघमारे ,सुरेश फिसके , आसीफ खान ,डाँ नकुल फुले , किरण देवकर ,सुभाष अढाव यांनी अथक परिश्रम घेतले.. सदर पुरस्कार मिळाल्याने गजेंद्र गवई यांचे वर समाज माध्यमातून व जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव हो आहे .