Home नांदेड अवैध वाळू उपसा प्रशासनाने तराफे अटाळा येथे जाळले

अवैध वाळू उपसा प्रशासनाने तराफे अटाळा येथे जाळले

527

धर्माबाद : ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे

धर्माबाद: तालुक्यातील आटाळा गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात तराफाद्वारे अवैध वाळूचा उपसा होत आहे ही माहिती मिळाल्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने 31 जानेवारी रोजी तराफे जाळून नष्ट केल्याची कारवाई केली आहे.धर्माबाद तालुक्यातील मौजे आटाळा गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा होत होता व बाबळी बंधार्‍याचे दरवाजे सध्या स्थितीत बंद असल्याने गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे.पाणीसाठा असल्यामुळे वाळू उपसा करता येत नाही.त्यामुळे वाळू माफिया नदीपात्रात तराफा द्वारे अवैध वाळू उपसा करीत आहेत याबाबत धर्माबाद महसूल प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर सोमवारी महसूल व पोलीस प्रशासनाने अटाळा येथे धडक कारवाई करीत अवैध वाळू उपसा करणारे तराफे जाळून नष्ट केले आहेत ही कारवाई धर्माबाद चे उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके तहसीलदार बी एन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या समवेत मंडळ अधिकारी जी एस गरुड यांनी तलाठी बीजी कदम,बीबी लोणे, पी आर जाधव भागवत, नाईकवाडे यु डब्ल्यू, आडे एम व्ही पांचाळ तसेच तहसील कार्यालय येथील कर्मचारी दत्ता बुनोड, या प्रमाणे शंकरपाळे लक्ष्मण संदीप बियांवर, पवन शंकरपाळे, बालाजी गुरूगुरुलवाड, विशाल पाटील, संदेश बाळापूरकर व सर्व पोलिस कर्मचारी यु. एम. मुंडे यांनी केले.