Home नांदेड मौजे जुन्नी येथे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल..!

मौजे जुन्नी येथे ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल..!

465

धर्माबाद : ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे

धर्माबाद तालुक्यातील मौजे जुन्नी येथे काल रात्री उशिरा ॲट्रॉसिटी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या गुन्ह्यातील आरोपी रामदास उर्फ बाबू जकोजी पाटील हे फरार असल्याचे समजते. दिनांक २२ जानेवारी रोजी दुपारी दोन तीस वाजता फिर्यादी गंगाराम दिगंबर पुनावाड हा कोळी समाजाचा युवक जेसीबी मशीन भाड्याने आणून शाळेच्या प्रांगणातील कामे जेसीबी मशिनच्या साह्याने आपल्या ऑपरेटरसह करीत होता. पण आरोपी रामदास उर्फ बाबू जकोजी पाटील या मराठा समाजाच्या इसमाने माझी जेसीबी मशीन सोडून दुसरी कशी काय आणलास? कोळ्याच्या तू लय माजलासरं असे जातीवाचक शिवीगाळ करीत फिर्यादी गंगाराम पुनावाड यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्यावर फिर्यादी गंगाराम पुनावाड यांनी धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या अनुषंगाने गु.र.न. १७/२३ कलम ३(१) आर.ड. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार व कलम ३२३,५०६ भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दस्तुरखुद्द पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड हे करीत असून काल त्यांनी मौजी जुन्नी येथे भेट दिली .आरोपी अद्याप फरार असून सदरील घटनेमुळे गावातील शांतता भंग झाली असल्याचे चित्र दिसत आहे.