दारव्हा (प्रतिनिधी):- समस्त बहुजन समाजाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हजरत टिपू सुलतान यांचा अवमान करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा निषेध व सामाजिक ,धार्मिक सलोखा बिघडवले वरून गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मा.तहसिलदार साहेब दारव्हा यांचे मार्फत बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याला सामाजिक ,सांस्कृतिक संघर्षाचा व गौरवशाली इतिहासाचा फार मोठा वारसा लाभलेला आहे.छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू, आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे.आर. एस. एस.प्रणित संघटना व या संघटनांचे प्रचारक ,प्रवक्ते नेहमीच देशातील नागरिकांचे मूलभूत व प्रासंगिक मुद्यावरून लक्ष हटवण्यासाठी व्देषपूर्ण वक्तव्य करून हिंदू – मुस्लिम असा संघर्ष उभा करताना दिसून येतात.यासाठी ते सातत्याने बेताल वक्तव्य करत असतात व यामध्ये प्रामुख्याने बहुजन समाज ज्यांना आपला प्रेरणा पुरुष मानतो अशा महापुरुषांची, महानाईकांची बदनामी नेहमीच करतांना दिसून येतात.विद्यमान महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हजरत टिपू सुलतान यांचे बाबत अवमान कारक वक्तव्य करून समस्त बहुजन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत.अशोभनीय कृत्य करून देवेंद्र फडणवीस हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे तसेच धार्मिक दूष्ट्या वातावरण कलुषित करून हिंदू मुस्लिम असा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हजरत टिपू सुलतान यांच्याविषयी त्यांनी केलेले वक्तव्य हे बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत.एकंदरीत आर एस एस प्रणित संघटनांचा बहुजन समाजातील महापुरुष महानायिका यांच्या बद्दल प्रचंड आकस आणि व्देष आहे आणि तो अशा प्रकारचे वक्तव्य करून वारंवार तो प्रकट करतांना दिसून येतात.
वास्तविक पाहता हजरत टिपू सुलतान हे मूलनिवासी बहुजनांच्या हक्क अधिकारासाठी लढणारे योद्धे होते.त्यांच्या कार्याविषयी माहिती अशी की,हजरत टिपू सुलतान हे हिंदू विरोधी किंवा बहुजन विरोधी नव्हते.,टिपू सुलतान यांनी एकशे छप्पन हिंदू मंदिरांना मदत केलेली आहे., श्रुंगेरी मंदिरावर (मठावर)सांगलीच्या पटवर्धन नावाच्या ब्राम्हणाने हल्ला केला होता तेव्हा ते मंदिर वाचविण्यासाठी हजरत टिपू सुलतान यांनी मदत केली होती.,बहुजन (हिंदू)महिलांना कमरेच्या वरती वस्त्र घालण्याचा अधिकार ब्राम्हणांनी नाकारला होता.तो अधिकार मिळवून देणारा एकमेव राजा हजरत टिपू सुलतान होय.,हजरत टिपू सुलतान यांच्या सैन्यात ६०% टक्के बहुजन (हिंदू) सैन्य होते.यावरून असे सिद्ध होते की हजरत टिपू सुलतान हे हिंदू विरोधी किंवा हिंदूचे दुश्मन नव्हते.त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले वक्तव्य मूलनिवासी बहुजनांच्या भावना दुखावणारे असून ते निषेधार्ह आहे. म्हणून धार्मिक , सामाजिक तेढ निर्माण केल्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या वर कठोर कारवाई व्हावी यासाठी हे एक दिवसीय आंदोलन समस्त बहुजन समाजाच्या वतीने सवैधानिक पद्धतीने करीत आहोत.
जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल होऊन उचित कारवाई करण्यात आली नाही तर संघटनेकडून येणाऱ्या काळात मोठ्या स्वरूपात राज्यव्यापी व राष्ट्रव्यापी उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल व यातून राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल.या आंदोलनामध्ये बहुजन क्रांती मोर्चा ,छत्रपती क्रांती सेना,बहुजन मुक्ती पार्टी व इतर बहुजन समाजातील संघटनांचा समावेश आहे.असे निवेदनात नमूद करून मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. बिमोद विठ्ठलराव मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारव्हा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी प्रशांत ठाणे (भारत मुक्ती मोर्चा दारव्हा तालुका अध्यक्ष),अनिल राऊत (छत्रपती क्रांती सेना दारव्हा तालुका अध्यक्ष), करण खंडारे (भारतीय बेरोजगार मोर्चा दारव्हा तालुका अध्यक्ष),सुनील मेश्राम,ओंकार मनवर, सैय्यद टेलर, संभाजी खडसे,आशिष फुसांडे,गजानन विर,उत्तम दळवे, प्रकाश वासनिक ,फिरोज खा पठाण, नसरुल्लाखान ,शंकर मेश्राम ,जगदीश चव्हाण,दिनेश राठोड,तुळशीदास वाघमारे, वहिद खान ,हाफिज ,अहेसान खान,युसुफ खान,शे.महेमुद,शेख रऊफ,सर्फराज अहमद,मु. जफर,मू.आशिफ,म. मुद्दशिर,सलीम जखुरा,अफरोज,अवेख खान ,फिरोज खान, शेख इफ्तेखार,मो.रवीश शेख,मुख्तार खान,अशोक ढवळे अशा अनेकजणांच्या सह्यानिशी निवेदन देण्यात आले.