फुलचंद भगत
वाशिम : जिल्हयातील शिरपूर (जैन) येथील प्रसिध्द अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज भेट दिली.
राज्यपालांसोबत आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अमित झनक,आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, श्री. विजयहंस विजयजी महाराज, श्री. परमहंस विजयजी महाराज, अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानचे ललितकुमार जयसिंग धामी, दिलीपकुमार नवलचंद शहा, कांतिलाल चंदनमल बरडिया, पारसमल गोलेछा, शिखरचंद बागरेचा, मनिष संचेती, अशोक भंसाळी, दिगंबर जैन संस्थानचे ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष चवरे, सचिव संजय कान्हेड, व्यवस्थापक बाबुराव बोराटे, रवि बज, समीर जोहरापूरकर, हरिष बज, देवेंद्र महाजन, राहुल मनारकर आदी उपस्थित होते. यावेळी संस्थानच्या दोन्ही ट्रस्टतर्फे राज्यपालांचा सत्कार करण्यात आला.
या तिर्थस्थळाचा विकास करण्यात यावा, तसेच इथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केल्या.
प्रारंभी शहरातील पारसबागेत राज्यपाल कोश्यारी यांचे आगमन झाल्यानंतर अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानतर्फे मुनीश्री विजयहंस विजयजी महाराज साहेब व श्री. परमहंस विजयजी महाराज साहेब यांच्यासह अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त दिलीपकुमार शाह, निर्माणाधिन नुतन जैन मंदिराचे अध्यक्ष ललितकुमार धामी, कांतिलाल बरडिया, पारसमल गोलेछा, शिखरचंद बागरेचा, निलेश सोमाणी, मनिष संचेती, अशोक भंसाळी आदींनी त्यांचे स्वागत केले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206