Home नांदेड तारीख पे तारीख बिलोली येथील ईनामी जागा प्रकरण

तारीख पे तारीख बिलोली येथील ईनामी जागा प्रकरण

254

प्रशासनाचे तात्पुरत्या मुतवल्ली पाठबळ

बिलोली/प्रतिनिधी

येथील दर्गा शहिद हजरत नवाब सरफराज खान व मशिदीच्या ईनामी सातबारावर खाजगी नावे आल्यामुळे येत्या मंगळवारी २२ फेब्रुवारी ला उपविभागिय अधिकारी यांच्या कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून वादग्रस्त व तात्पुरत्या मुतवल्ली सह सातबारावर नावे असलेल्या ईतर खाजगी व्यक्तिंना सुनावणीस हाजिर होण्याची नोटीस काढणार असल्याची माहिती उपविभागिय कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली आहे.कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तात्पुरत्या मुतवल्लीला पाठबळ देण्यात येत असून त्यामुळेच प्रशासनाच्या वतीने तारीख पे तारीख देण्यात येत असल्यामुळे प्रशासनाबद्दल नाराजिचा सुर उमटत आहे.
◼️शहरातील ऐतिहासिक दर्गा शहिद हजरत नवाब सरफराज खान व मशिदीच्या नावे हैद्राबाद-नरसी महामार्गावर रोडच्या दुतर्फा महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकिची ईनामी जागा आहे.सर्व्हे क्रंमांक ५७७,५८० या सातबारावर दर्गा व मशिदीचे वादग्रस्त तात्पुरते मुतवल्लीनी आपल्यासह आपल्या नातेवाईकांची,खाजगी व्यक्तिंची नावे महसुल च्या नियमांना डावलून बेकायदेशीर व अनाधिकृतपणे तत्कालीन तलाटी व मंडळअधिकारी,महसूल च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन नावे लावून घेतली.जे कि अनाधिकृत आहे.सदरिल प्रकरणात शासन निर्णय क्रंमांक २०१५/ज-१अ/दि.१३ एप्रिल २०१६ नुसार राज्यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मालकिच्या जिथे जिथे ईनामी जागा आहे.व अश्या ईनामी जागेच्या सातबारावर लावण्यात आलेली सर्व खाजगी नावे महसूल प्रशासनाने परिपञकानुसार काढुन मालकी रकान्यात सबंधित देवस्थान/मस्जिद,दर्गा यांचे नावे घेऊन ईतर हक्कात प्रतिबंधीत सत्ता प्रकार अशी नोंद घेण्यात यावी असे ह्या शासन निर्णयात आदेशीत करण्यात आले असून बिलोली येथील ऐतिहासिक मशिद कला दर्गा टोम्ब नगारखाना चे तात्पुरते मुतवल्लीनी ईनामी खिदमत माश जागेच्या सातबारावर खाजगी नावे लावून घेतली आहे.हि सर्व नावे काढण्यासाठी शहरातील मुस्लिम बांधव,(स्थानिक मुस्सलियान)सामाजिक कार्यकर्ते यांनी रितसर तक्रार दिली होती.
◼️तक्रारीच्या अनुषंगाने दि.८ व दि.२२ डिसेंबर२०२१ अश्या दोन वेळा तहसिलदार यांच्याकडे सुनावणी घेण्यात आली.पण तहसिलदार यांना सातबारावरील नावे काढण्याचा अधिकार नसल्याने ह्या प्रकरणाची संचिका सध्या उपविभागि अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली.या प्रकरणाची सुनावणी उपविभागीय अधिकारी बिलोली यांच्या दालनात १ फेब्रुवारी ला होती.पण उपविभागिय अधिकारी यांनी हि सुनावणी पुढे ढकलली आहे.या सुनावणीत ईनामी खिदमत माश जागेच्या सातबारावरील मालकी रकान्यात कट झालेले व ईतर हक्कात लावण्यात आलेले सर्व खाजगी नावे निघतिल का? तसेच दर्गा व मशिदीचे तात्पुरते मुतवल्ली यांनी महामार्गावरील ईनामी जागा अनाधिकृतपणे विनापरवानगी भाड्याने,गहाण,करारपध्दतीने दिले आहे तसा स्पष्ट अहवाल वक्फ अधिका-यांनी दिला आहे.येथील मंडळअधिकारी यांनी सुध्दा सदरिल सर्व नावे काढण्यात यावे असा अहवाल तहसिल कार्यालयात दिला आहे.यावर अद्याप कोणतीच कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नाही.वक्फ बोर्ड मंडळ व उपविभागिय कार्यालय बिलोली हे या तात्पुरते मुतवल्लीवर काय कारवाई करतील याकडे येथिल मुस्लिम बांधवांच लक्ष आहे.ह्या प्रकरणाची सुनावणी तारीख पे तारीख वाढत असल्यामुळे येथील तात्पुरते मुतवल्ली यांनी आमच्या विरोधात तक्रार का दिली म्हणून तक्रारदार यांना धमकावत असल्याचेही ऐकावयास येत असुन सोशल मिडिया व्हाॕटसअॕप ग्रूप च्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपाची फैरी झडत आहेत.एकमेकांवर आरोप होत आहे.पोलीस प्रशासनन यावर नजर ठेवून असल्याची माहिती मिळत आहे.जेणेकरुन काही अनुचित प्रकार होणार नाही.या प्रकरणाविषयी शहरात तर्क वितर्क चर्चेला उधाण येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची दाट शक्यता असल्यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांनी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष घालून हे वादग्रस्त प्रकरणाची विनाविलंब जलद गतीने लवकरात लवकर सुनावणी घेऊन सर्व नावे काढुन प्रकरण निकाली काढावे अशी मागणी येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने होत आहे.