Home नांदेड संक्रांत निमित्त संध्याताई राठोड यांनी केला विधवा परीतक्त्या निराधार महिलाचा सत्कार.

संक्रांत निमित्त संध्याताई राठोड यांनी केला विधवा परीतक्त्या निराधार महिलाचा सत्कार.

347

प्रतिनिधी : मजहर शेख

नांदेड/मांडवी,दि : १० :- संक्रांतिचा सण म्हणजे सुवाशिंनीना हळदी कुंकु ,तिळगुळ व वाण देऊन सगळीकडे सामुहिकपने साजरा होणारा सण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विक्रम राठोड,  पो उप निरीक्षक शिवप्रसाद कराळे,पो उप  निरीक्षक झेड ए पठान,शोभाताई महामुने, सविताताई राठोड,भारतीताई कपाटे, सुकेशिनीताई माटे, अश्विनीताई पाटील,प्रमिलाताई भुसारे,सागर शिंदे,भावनाताई दीक्षित,माजीसरपंच सुमंनबाई पेंदोर,माजी जीप सदस्या नंदाताई पवार ,सविताताई पवार ,योगेश जाधव,प्रशांत राठोड,रवि कोडमवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात महिलांना हळदी कुंकुचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

पण त्याबरोबरच विधवा निराधार व परीतक्त्या असून मोलमजूरी करून आपल्या मुलांचा व कुटुंबाचा समर्थपने संभाल करणाऱ्या चौदा महिलाचा साडी चोळी देऊन सत्कार केला तेव्हा या चौदाजनीच्या डोळ्यात पाणी तरळले.  याप्रसंगी संयोजक आयोजक संध्याताई राठोड,शिवप्रसाद कराळे, प्रफुल्ल राठोड प्रास्ताविक सौ.पद्माताई गि- हे व या सर्वांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात स्व.लता मंगेशकर यांना श्रधांजलि अर्पण करण्यात आली.सुत्रसंचालन डॉ. पद्मा मदकुंटे यांनी तर आभार महिनाज मुजावर यांनी मानले.