युवा स्वाभिमान कार्यकर्त्यावर ३०७ कलमान्वये गुन्हाअमरावतीत राजकीय वाद चिघळला : पाचही आरोपींना १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी.
मनिष गुडधे
अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केल बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी आता आमदार रवी राणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याची पार्श्वभूमी या घटनेमागे असल्याचे बोलले जात आहे. ‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी १२ जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने १६ जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा विरुद्ध प्रशासन असा बाद पेटला आहे. ही बाब आ. रवि राणा यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, भाजप गटनेते तुषार भारतीय आदींना लक्ष्य केले. याप्रकरणी आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीच्या हल्ल्यानंतर आता रवि राणांविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय म्हणाले रवी राणा? याबाबत आमदार रवी राणा यांनी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो. मीही माध्यमातून या बातम्या वाचल्या आणि पाहिल्या आहेत. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या अंगावर शाईफेक केल्याचं राणा यांनी म्हटले. तसेच, मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री यांच्यावरील दबावामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला काही पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. राजकीय सूडबुद्धीने मला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही आमदार राणा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे एका सुईचादेखील कुठे पुरावा मिळत नाही, पण ३०७ चा खोटा गुन्हा दाखल केल्याचं राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. अमरावतीत आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी पाचही आरोपींना १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचा राग म्हणून काल मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक करून त्यांचा निषेध केला होता. यात पोलिसांनी रवी राणा सह ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. तर यात पाच आरोपींना अटक केल्या नंतर पाचही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १३ फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच ३ तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहेत, तर शाईफेकीच्या घटनावेळी रवी राणा उपस्थित नव्हते त्यामुळे त्यांच्यावर आच्छार्य चकित पणे चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल पोलिसांनी केले अशी प्रतिक्रिया आरोपींचे वकील दीप मिश्रा यांनी दिली.