घरकुलां विषयीच्या सर्व तक्रारीचे जागेवरच होणार निराकारण!
धर्माबाद : ता. प्रतिनिधी राहुल वाघमारे
धर्माबादेत येत्या १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान आमदार राजेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समितीच्या प्रांगणात भव्य अशा घरकुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील घरकुलांविषयीच्या सर्व तक्रारीचे जागेवरच निराकारण होणार असून या मेळाव्याचा तालुक्यातील घरकुला विषयीच्या सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी केंद्रे यांनी केले आहे.
आमदार राजेश पवार यांनी आपल्या मतदारसंघातील गावभेटी दरम्यान विविध कार्यक्रमानिमित्त गावातून रस्त्यावरून जाताना बहुतांशी नागरिकांना तुम्हाला घरकुल मिळाले का काका? असा प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यांच्या अशी एक गोष्ट लक्षात आली की घरकुला विषयाच्या बऱ्याच गोष्टी पात्र नागरिकांना माहीतच नाहीत. त्यामुळे ते घरकुलां पासून वंचित राहत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतातील घरकुला विषयीची एक महत्त्वकांक्षी योजना असून २०२४ पर्यंत सर्व लाभधारकांना घरकुले मिळालीच पाहिजेत त्या दिशेने त्यांचे प्रयत्न चालू असून त्याचाच एक भाग म्हणून आमदार राजेश पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी पुनमताई पवार ह्या गाव भेटी दरम्यान घरकुलां विषयी सर्वांना जागृत करीत आहे.
केवळ धर्माबाद तालुक्यात ७ हजार लाभार्थ्यांचे अर्ज आले असून त्या अर्जाची आता तपासणी व शहनिशा चालू आहे. या घरकुल योजनेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे कुटुंब प्रमुखाचे जॉब कार्ड असते. त्यावरूनच घरकुलाची योजनाची पुढची नीती अवलंबून असते. पण बऱ्याच ग्रामसेवकांनाही माहित नाही की एकट्या माणसाचेही जॉब कार्ड निघू शकते. तर त्या दिशेने ते प्रयत्न करीत नाहीत. घरकुल यादीत नाव होते पण काही कारणामुळे त्यांना घरकुलाचा लाभ व हप्ता मिळाला नाही ,आपले यादीत नाव आहे का नाही हे ही बहुतांशी गावातील पात्र घरकुल लाभार्थ्यांना माहिती नाही.
उपरोक्त गोष्टी जेव्हा आमदार राजेश पवार यांच्या लक्षात आल्या तेव्हा त्यांनी आपला सर्वे चालू केला. त्या सर्वे दरम्यान प्रत्येक लाभार्थ्यांच्या थेट भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेणे डोअर टू डोअर फिरून घरकुल लाभार्थ्यांच्या सत्यता तपासणे अशा पद्धतीची कामे त्यांनी चालू केली असून एकंदरीतच पंचायत समिती कार्यकक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेही बरेच घरकुल लाभार्थी घरकुल मिळण्यापासून वंचित राहत आहेत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर आमदार राजेश पवार यांनी आपल्या अधिकार कक्षेत राहून धर्माबाद पंचायत समितीच्या प्रांगणात भव्य घरकुल मेळाव्याचे दिनांक १६ फेब्रुवारी रोजी आयोजन केले असून घरकुला संबंधी काहीही अडचणी असल्यास त्या जागेवर सोडवण्यावर ते भर देणार आहेत. जिल्ह्यातील असा पहिलाच आमदार व पहिलाच घरकुल मेळावा असून घरकुला संबंधीच्या सर्व समस्याचे निराकरण व्हावे असे पात्र लाभार्थ्यांना वाटत असेल तर त्यांनी उपरोक्त मेळाव्याचा वेळेत येऊन लाभ घ्यावा असे आवाहन गटविकास अधिकारी केंद्रे यांनी केले आहे.
*—चौकट—*
उपरोक्त मेळाव्यास गटविकास अधिकारी, सगळे विस्ताराधिकारी, सर्व गावचे ग्रामसेवक, तलाठी, व घरकुल योजने संदर्भातील सर्व कर्मचारी उपस्थित राहतील. या मेळाव्यास जाणून बुजून अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केल्या जाणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेश पवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे केले.