Home बुलडाणा वृक्षरोपनातून काळे कुटूंबियांनी दिला सामाजिक संदेश , “काळे कुटूंबीयाचा नवा आदर्श,तरूणाई फाऊडेशनचा...

वृक्षरोपनातून काळे कुटूंबियांनी दिला सामाजिक संदेश , “काळे कुटूंबीयाचा नवा आदर्श,तरूणाई फाऊडेशनचा पुढाकार”

157

 

बिबी (प्रतिनिधी कैलास राऊत),ता.12: आई खरंच काय असते…लेकराची माय असते…वासराची गाय असते…दुधाची साय असते…लंगडयाचा पाय असते…धरणीची ठाय…आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही… आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर याच भूतलावरील वात्सल्याचे रूप…जीवनाला आकार व जगण्याला बळ व दिशा देणारी एक पाऊलवाट… उभ्या आयुष्याला संस्काराची शिदोरी देवून आयुष्य आनंदीमय व आल्हादायक करणारी एक सोनरी पहाट…

अशा वृध्द आईच्या अल्पशा आजाराने ऐकाऐकी जाण… अनावर झालेले दुःख व त्या दुःखातून सावरून ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख असणा-या लोणार तालुक्यातील बिबी येथील काळे कुटुंबीयांनी आईच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी रूढी, परंपरेला बगल देत आईच्या रक्षा नदीच्या पात्रात विसर्जीत न करता स्मशान भूमीत पाच खड्डे खणून त्यामध्ये ही रक्षा व माती टाकून त्याठिकाणी पाच वृक्षांचे रोपन करून पर्यावरणाचा समतोल व सामाजिक बांधीलकी ठेवून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे. याकामासाठी तरूणाई फांउडेशनचे अध्यक्ष पत्रकार कैलास राउत देऊळगाव माळी,यांनी पुढाकार घेतला.
लोणार तालुक्यातील बिबी येथील हाँटेल व्यवसायिक व शेतकरी गजानन म्हतारजी काळे यांच्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक असलेले विष्णुपंत गजानन काळे यांच्या आई मथुराबाई गजानन काळे यांचे गुरूवारी (दि.१० फेब्रुवारी) रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ७८ व्या वर्षी दु:खद निधन झाले. मथुराबाई यांना रामकिसन, विष्णुपंत व काशिनाथ काळे असे तीन मुले व यशोदाबाई गवरकर , कुषिवर्ता लिंगाईतकर अशा दोन मुली असुन . मथुराबाई काळे यांच्या रक्षाविसर्जन प्रसंगी तरूणाई फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा समाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राऊत देऊळगाव माळी यानी पुढाकार घेऊन झाडे लावण्याची संकल्पना काळे परिवारा दिली व त्यानुसार गजानन काळे यांनी होकार देऊन स्मशानभुमी पिंपल,लिंब, जांभुळ,उंबर,या दिर्घ कालीन झाडाची लागवड विविध मान्यवराच्या हस्ते केली. यावेळी बिबी ग्रामपंचायत चे सरपंच दिपकराव गुलमोहर , भाजपा नेते विनोद वाघ यांचे वडिल लक्ष्मणराव वाघ ,ह.भ.प.केशवमहाराज बुधवंत,गजानन म्हतारजी काळे,पञकार देवानंद सानप,पञकार रमेश खंडागळे,पञकार भागवत आटोळे,पञकार राजुभाऊ मुळे,पञकार चव्हाण,जगन गवरकर सर,तुकाराम काळे , रामकिसन काळे ,निंबाजी राऊत,हरिभाऊ राऊत, यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. या शोकसभेची सूत्रसंचालन व आभार पञकार कैलास राऊत यांनी केले

वृक्षसंपोनाची काळे कुटूंबीयांनी घेतली शपथ…
काळे कुटूंबीयांनी आईच्या रक्षाविसर्जन प्रसंगी ५ वृक्षांची नुसती लागवडच केली नाही तर त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याची सर्वस्वी जबाबदारी स्व.मथुराबाई गजानन काळे यांचे मुले विष्णु काळे , काशीनाथ काळे,त्यांचे नातु विठ्ठल काळे,मोहन काळे ,नामदेव काळे अनंता काळे यांनी काळजी घेण्याची शपथ यावेळी घेतली. काळे परीवारातील सदस्यानी लागवड केलेल्या झाडाची संपुर्ण संगोपनासाठी उचलेले सामाजिक पाऊल खरोखरच कौतुकास्पद आहे. (चौकट )…….
वृक्ष सवंर्धनासाठी कटिबध्द रहा!-हभप केशव महाराज बुधवंत.
वृक्ष हा पर्यावरणातील महत्वाचा घटक असून पर्यावरण अबाधित राखण्यासाठी महत्वाची भूमीका पार पाडतो. वृक्षाची उपरोपकारी वृत्ती ही समाजातील प्रत्येकासाठी तितकीच महत्वाची आहे. पर्यावरणाचा -हास टाळण्यासाठी वृक्षतोड थांबवा! वृक्ष सवंर्धनासाठी कटिबध्द रहा! असा मौलीक संदेश यावेळी हभप केशव महाराज बुधवत यांनी उपस्थितांना दिला.