Home जळगाव जामनेरात कर्नाटक सरकार ड्रेस कोड नियम रद्द करणे बाबत तहसीलदारांना खिदमतगार फलाही...

जामनेरात कर्नाटक सरकार ड्रेस कोड नियम रद्द करणे बाबत तहसीलदारांना खिदमतगार फलाही तंजीम कडून निवेदन

124

 

रावेर (शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे तहसीलदारांना दिले निवेदन कर्नाटक कुंडपुरा गव्हर्मेंट कॉलेज येते ड्रेस कोड लागू करून मुस्लिम धर्मीय बुरखा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश बंद केल्यामुळे, त्या कॉलेजातील बुरखा परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान करण्यात येत आहे.तसेच भारतीय संविधानात सर्व धर्माचे नागरिकांना त्यांच्या धर्मानुसार राहण्याची परवानगी आहे.असे असतांना, कर्नाटक सरकार हे राज्यात जातिवाद तिढा निर्माण करण्याच्या पर्यंत करीत आहे.

खिदमतगार फलाही तंजीम जामनेर, चे सर्व पद अधिकारी सदस्य, आणि सर्व समाज बंधू आणि विद्यार्थिनी, या कर्नाटक सरकारच्या तीर्व शब्दात निषेध केला.आणि मागणी करण्यात आली की ड्रेस कोड, त्वरित रद्द करून बुरका परिधान, करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्वी प्रमाणे महाविद्यालयात प्रवेश द्यावा, असे निवेदन देण्यात आले.यावेळी मुस्लिम महिला.पठाण रजिया, सालिया शेख मुसा, फातिमा जोहरा,नौशीन शेख नबी, रुबीना परवीन,जेबा अतीक काझी,अनम फिरदोस, डॉक्टर बुशरा जहा, कौसर जहा,अतीया बेगम,यासमीन नसीमखान,आफरीन रईसखान, सुमय्या अजीम खान, त्यांच्या बरोबर, मौलाना इम्रान, मुफ्ती रउफ, डॉक्टर इमतियाज खान, शेख हारून, अलियार खान, इम्रान अमजद खान, अहमद खान, बबलू खान, फिरोज खान, अजहर शेख, शाहिद शेख, अनस खान, आफताब, अरकम खान, शादाब खान, बुरहान शेख, राजू शेख, उपस्थित होते.