प्रतिनिधी : मजहर शेख,नांदेड
हिंगोली,दि : १३ :- सामाजिक अधिकारीता आणि राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिकांना साहीत्य वाटपासाठी तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे आदरणीय लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या पुढाकारातून लोकसभा मतदारसंघात गतवर्षी जानेवरी महिन्यात ४ हजाराच्यावर दिव्यांगांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये एकूण ३२६० लाभार्थी साहित्यासाठी पात्र ठरले आहेत, तपासणी शिबिरामध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना साहित्य मिळाले.
औंढा नागनाथ तालुक्यातील २८० दिव्यांग बंधू भगिनींना साहित्य वाटपाचा कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला जानेवारी 2022 मध्ये झालेल्या दिव्यांग तपासणी शिबिरामध्ये साहीत्यासाठी तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. दिव्यांग बांधवांसाठी विनामूल्य कृत्रिम अवयव, ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड, कॅलिपर, ब्रेल किट,आदी साहित्य वाटप करण्यात आले, त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांना साहित्य भेटले त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणित झाला, याचे समाधान वाटले, असे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील म्हणाले.
हेमंत पाटील यांनी दिव्यांग बांधवांशी सवांद साधून त्यांच्या व्यथा अनुभवल्या होत्या, दिव्यांग बांधवांची एकंदरीत परिस्थिती पाहून खासदार हेमंत पाटील अत्यंत भावूक झाले होते . त्यावेळी ते म्हणाले होते कि, दिव्यांगांसाठी करत असेलेले काम हे कागदोपत्री न राहता आपली सामाजिक जबाबदारी आणि त्यांच्याप्रति प्रेम, जिव्हाळा व आपुलकीची भावना ठेवून केल्यास हीच खरी ईश्वर सेवा असेल, त्यांना समाजाच्या इतर घटकाप्रमाणे स्थान देऊन हिंगोली लोकसभा मतदार संघातील एकही दिव्यांग बांधव शासकीय योजनेपासून वंचित राहणार नाही याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे, असेही यावेळी खासदार साहेब म्हणाले आणि त्यांनी हे करून दाखवले. फक्त कागदोपत्री न ठेवता औंढा तालुक्यातील दिव्यांग बंधू भगिनींना त्यांनी साहित्य दिले.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख औंढा साहेबराव देशमुख, वसमत तालुकाप्रमुख राजु चापके, औंढा तालुकाप्रमुख अंकुश आहेर, शहर प्रमुख अनिल देव, नगरसेवक अनिल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य श्री शैल्य स्वामी, जि.प. सदस्य माऊली झटे, जि.प. सदस्य डि.वाय घुगे, माजी जिल्हा परिषद सभापती राजुभाऊ मुसळे, नगरसेवक कपिल खंदारे, नगरसेवक मनोज देशमुख, नगरसेवक दिलीप राठोड, नगरसेवक प्रदिप कनकुटे, नगरसेवक राहुल दंतवार, नगरसेवक विष्णू पवार, सर्कल प्रमुख राजू पाटील कऱ्हाळे, सर्कल प्रमुख गंगाधर पोले, सर्कल प्रमुख पांडुरंग नागरे, युवासेना जिल्हा समन्वयक लखन शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख चांदु शिंदे, उपजिल्हा समन्वयक गजानन मुळे, युवा सेना तालुकाप्रमुख माऊली भालेराव, लक्ष्मीकांत देशमुख, युवासेना सर्कल पमुख प्रदीप गिरी, सि.जी. लोंढे, विलास साखरे, माऊली मगर, शंकर यादव, लक्ष्मण ढोबळे, ह भ प विजय महाराज वाघ, मुंजाप्पा ढोबळे, अलिमको कानपूर येथून आलेले डॉक्टर सर्जन भालेराव, डॉक्टर राजकुमार यादव, डॉक्टर संकेत देवसवार, डॉक्टर श्याम ललित, डॉक्टर अनिल देवसरकर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक दिलीप गडदे, गटविकास अधिकारी जगदीश शाहू, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव व शिवाजीराव गावंडे यांच्यासह दिव्यांग बांधव व ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.