Home सातारा डॉ राजाराम माने यांची वरिष्ठ प्राध्यापक पदी निवड

डॉ राजाराम माने यांची वरिष्ठ प्राध्यापक पदी निवड

636

मायणी – सतीश डोंगरे
उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये दुर्मिळ असणा – या वरिष्ठ प्राध्यापक वर्ग क्रमांक १५ या पदावर स्वा.रा.ती.म. विद्यापीठ , नांदेड मध्ये गेल्या पंचविस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच मायणी गावचे सुपूत्र प्रा . राजाराम माने यांच्या निवडीस उच्च व तंत्रशिक्षण विभाग पुणे , यांनी मान्यता दिली आहे .
उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यापीठ स्तरावर अनुभवी प्राध्यापकासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार केवळ १० टक्के प्राध्यापक या पदासाठी उपलब्ध असतात . स्वा.रा.ती.म. विद्यापीठ , नांदेड येथे कार्यरत असलेले मायणी गावचे सुपूत्र प्राध्यापक राजाराम माने यांची वरिष्ठ प्राध्यापक या पदावर नुकतीच विद्यापीठ प्रशासनाने नियुक्ती केली आहे . प्रा . माने यांनी हया विद्यापीठात मागिल कित्येक वर्षे केलेल्या उच्च प्रतिच्या संशोधन , शैक्षणिक , सामाजिक कार्याची दखल घेवुन करण्यात आली आहे .
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एडि सायन्टीफीक इंडेक्सच्या जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत स्वा.रा.ती.म. विद्यापीठामधुन त्यांचा जागतीक कमवारीस उच्च दर्जाच्या दोन टक्के शास्त्रज्ञामध्ये समाविश झाला आहे . सुमारे पाचशे पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय प्रकाशने , संशोधन पुस्तके , नियतकालीकेतील पत्रके व पेटंन्टस हे त्यांच्या कार्याचे स्वरूप आहे . मागील दहा वर्षात त्यांनी बारा देशामध्ये संशोधन व्याख्याने दिली आहेत .
नुकताच त्यांची दक्षिण कोरीयाच्या पुसान नॅशनल विद्यापीठात एक वर्ष शास्त्रज्ञ म्हणुन कार्यकाळ पुर्ण केला आहे . त्यांचा कार्याचा उचीत गौरव वरिष्ठ प्राध्यापक पदी निवड करून विद्यापीठ प्रशासनाने केलेला आहे . या त्यांच्या नियुक्ती बाबत स्वारातीम विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा . जोगेंद्रसिंग बिसेन यांनी नियुक्तीचे पत्र दिले या नियुक्ती बददल विद्यापीठ प्रशासन व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सातारा जिल्हाउध्यक्ष व खटाव तालुका कार्याध्यक्ष ,लेखक बाळासाहेब कांबळे तसेच समस्त मायणी तील ग्रामवासीयांनी प्रा . राजाराम माने यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .