वाशिम :- मध्यप्रदेशातील बैतुल जिल्यातील जंगल-खोरे परिसर पर्यटकांना विशेषता साहसी पर्यटकांना नेहमीच खुणावत आले आहे.भोंड्याकुंड परिसरातील खोऱ्यांचे संकुल आपल्या वैशिष्टयपूर्ण रचनेने नटलेला असा परिसर.ह्या परिसरातील 200 पेक्षा अधिक फूट खोल आणि तिच्या दोन्ही टोकांमधील सुमारे 400 फुटांचे अंतर दोरावरून पार करणे हा एक थरारक अनुभवच!चारशे फुटांच्या व्हॅली क्रॉससिंग ची चाचणी दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी अकोला जिल्हा गिर्यारोहण संघटना व अमरावती जिल्हा गिर्यारोहण संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले होते.
त्यासाठी गेल्या वर्षभर ह्या परिसरातील विविध पदभ्रमण मार्गांची पाहणी करण्याचा उपक्रम अमरावतीचे हेमंत थेटे व इतर सहकारी यांनी राबविला होता.या सर्व प्रयत्नांची परिणीती म्हणजे व्हॅली क्रॉससिंग ची यशस्वी चाचणी म्हणता येईल. व्हॅली क्रॉससिंग च्या अत्यंत जोखमीच्या उपक्रमासाठी तांत्रिक कैशल्याची बाजू धिरज कातखेडे आणि धनंजय भगत (अजिंक्य फिटनेस पार्क, अकोला) ह्यांनी सांभाळली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक चमू मध्ये सर्वश्री रोहित कोठडे, ओंकार थेटे,प्रतीक काळे,अमेय कंजूरकर, अमेय कन्नूरकर,मनिष वानखडे, सुनील आणि अशोक यांचा समावेश होता.लवकरच हा उपक्रम सर्व स्तरातील नागरिक व विद्यार्थ्यांना करिता घेण्यात येणार आहे असे सांगण्यात आले आहे.या ऊपक्रमासाठी वाशिम पोलीस दलातील ऊपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे,वाशिम पोलिस दलाचे रविंद्र कातखेडे यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन ऊत्साह वाढवला तसेच भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206