रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे;धुळीने प्रवाशी तसेच नागरिक ञस्त! तात्काळ काम सुरु करावे अन्यथा अंढेरावासी आंदोलनाच्या पवित्र्यात!
प्रतिनिधी:-[ रवि अण्णा जाधव ]
देऊळगाव राजा:- मागील दोन ते तीन वर्षापासुन अंढेरा फाटा ते मेरा बु! रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असुन सदर रस्त्यावर जागोजागी ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले असुन यामुळे प्रवाशाच्या अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत असुन सदर रस्त्यावर संपुर्ण रोडच भुईसपाट झाल्याने रोडवर सगळीकडे धुळच-धुळ होत असुन या सर्व प्रकाराला अंढेरा येथील नागरिक ञस्त झाले असुन संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष व वनविभागाचे आडमुठे धोरण याला कारणीभूत आहे.
सार्वाजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजाच्या दुर्लक्षामुळे अंढेरा फाटा ते मेरा बु! रोडची चाळणी झाली असुन रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असुन रोडच्या दोन्हीही साईडच्या चरा खचल्या आहेत.गेल्या दोन ते तीन वर्षापासुन फक्त थातुरमातुर ङागङुजी करण्यात येते.अंढेरा फाटा ते ३३के.व्ही.उपकेंद्र अंढेरा पर्यंतचा रोड हा वनविभागाच्या हद्दीतुन जात असुन वनविभागाने या हद्दीतुन रुंदीकरणास विरोध केल्याने जवळपास दोन वर्षांपासून अंढेरा वाशी ञस्त आहे.अंढेरा गाव ते पुढे हा रस्ता मेरा बु! व दरेगाव मार्गे शेंदुरजनला जातो.सदर रोडवर मोठ्या प्रमाणात दिवसभर वाहतुक सुरुच असते.अंढेरा गावात पोलीस स्टेशन,राष्ट्रीयकृत बँका तसेच महाविद्यालय असल्याने या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरुच असते.रोडवर सगळीकडे धुळच धुळ होत आहे.या सर्व प्रकाराला अंढेरा सह परिसरातील प्रवाशी कंटाळले असुन येत्या आठ तात्काळ काम सुरु न झाल्यास अंढेरा ग्रामस्थाच्या वतीने रास्ता रोको तसेच भव्य आंदोलन करण्यात येणार आहे.
अपघाताच्या संख्येत वाढ!
सदर रोडची अवस्था दयनिय झाली असुन रस्त्यावर सगळीकडे खड्डेच खड्डे पडले आसुन सगळे दुचाकी चालक रस्त्याच्या मधोमध गाडी चालवत असुन तसेच रस्त्यावरील खड्डे मोठमोठाले असल्याने अंदाज येत नसल्यामुळे खड्डे चुकवण्याच्या नांदात दररोज अपघात होत अजुन प्रशासन अजुन किती जिव घेणार आहे.तरी भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी मातृतिर्थ जिह्याचे पालकमंञी तसेच अन्न व औषध प्रशासन कँबिनेट मंञी डाँ राजेंद्रजी शिंगणे साहेबांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन संबंधित कामावर तात्काळ निधी उपलब्ध करुन तात्काळ काम सुरु करण्याचे आदेश विभागाला व ठेकेदाराला द्यावे अशी मागणी मतदार संघातुन होत आहे.
स्टोंन क्रेशरवरुन होते दिवसभर अवैध टिप्पर वाहतूक!
सिंदखेड राजाचे मा.आमदार डाँ,शशिकांत खेडेकर यांच्या कार्यकाळात अंढेरा फाटा ते मेरा बु!रोङच्या नवीन कामाला मंजुरी मिळाली होती.तब्बल तीन वर्षे होऊन सुध्दा आजपर्यंत रस्त्याची परिस्थिती जैसे थेच आहे.अंढेरा मेरा बु! रोडवरील दत्तकृपा स्टोन क़्रेशर व सदगुरु स्टोंन क्रेशर यांनी सर्वच नियम ढाब्यावर बसवत याच रोडने दिवसभर अवैध गौण खनिज गिट्टीने भरलेले टिप्पर वाहतुक होत असुन महसुल विभाग गप्प का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.सदर टिप्पर वाहतुकने रोडवरील डांबर हे पुर्णपणे खरडले असुन त्यांच रोडवर स्टोंन क़्रेशरचा नंगा नाच आजही जोमात सुरू आहे.आणि नागरिक हे धुळीने कोमात.एवढेच नव्हे सदर रोड हा जड टिप्पर वाहतुकीचा नसुन तरी सुद्धा टिप्पर वाहतूक सुरुच असते.स्टोन क़्रेशर मालक यांना नागरिकांना धुळीचा ञास होऊ नये यासाठी पाणी मारावे असे तहसिलदार देऊळगाव राजा यांचे आदेश असतानाही रोडवर एकही दिवस पाणी मारल्या जात नाही हे याठिकाणी विशेष!
[तात्काळ रोडचे डांबरीकरण करा अन्यथा तिव्र आंदोलन!
अंढेरा फाटा ते मेरा बु! रोडच्या नवीन डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करा.अन्यथा झोपलेल्या प्रशासनाला जागी करण्यासाठी तिव्र स्वरुपाचे आंदोलन तसेच रास्ता रोको करण्यात येईल!
श्री सुभाष डोईफोडे
शिवसेना विभाग प्रमुख,अंढेरा.
“अंढेरा मेरा बु! रोडची अवस्था दयनिय झाली असुन यासंदर्भात कालच पालकमंत्री व वनविभाग यांच्याशी बोलणे झाले असुन येत्या आठ दिवसात अंढेरा फाटा ते मेरा बु!रोडचे काम सुरु करण्यात येईल!”
श्री नितीन चौधरी
ठेकेदार,बुलढाणा