Home बुलडाणा धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाई करा

धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाई करा

502

सर्व समाजबांधवांचे गृहमंत्र्यांना निवेदन

हनिफ शेख 

अंढेरा ता , देऊळगावराजा प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पवित्र रमजान सणाच्या तोंडावर सभा घेऊन हिंदू-मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त वक्तव्य करीत आहे.त्यांचा वक्तव्यामूळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून सभेला बंदी घालावी,अशी मागणी आज ता.१७ समाज सर्व समाज बांधवांनी राज्याचे गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे पोलीस निरीक्षकांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
देऊळगांव राजा पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद आहे की,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून हिंदू – मुस्लिम समाजामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावे म्हणून बेताल व्यक्तव्य करीत आहे.मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिण्याच्या तोंडावर सभा घेऊन मुस्लिमांच्या भावना दुःखवतील असे वक्तव्य करीत आहे.राज्यात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने राहत असून मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात सदैव महाराजांन सॊबत लढला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढे प्रेम आपल्या समाजातील लोकांवर केले तेवढेच प्रेम मुस्लिम मावळ्यांना दिले आहे.स्वराज्यात मुस्लिमांना नमाज पठण करण्यासाठी स्वतंत्र जागा छत्रपती शिवाजी महाराजांनी उपलब्द करून दिली होती. असा इतिहास मुस्लीम समाजाचा असताना राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून स्वतःचा टीआरपी साठी बेताल वक्तव्य करून हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे.या महिन्यात गुढीपाडवा, हनुमान जयंती,राम नवमी,महात्मा फुले जयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान सुरू आहे.हिंदू-मुस्लिम समाजातील बांधव आनंद उत्सव साजरा करीत आहे.मात्र राज ठाकरे हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण खराब करीत आहे.त्यामुळे त्यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा सभेला बंदी घालावी,अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी इस्माईल बागवान, राजेश इंगळे,अजमत खान,शाकीर लाला,जहीर खान,राजू मांटे,शेख कदीर,सय्यद करीम हनीफ शहा,निलेश गीते,शेख अमीन,सलीम खान,मोसिन उद्दीन,शेख सलीम,शेख अकबर, मोहम्मद नासिर, शेख अतिक,विकास कासारे, तौसीफ कोटकर,प्रकाश बसी,जावेद खान,आकाश कासारे, राहुल कासारे, अल्ताफ कोटकर, शेख अन्वर,अतिश खराट,अमोल कासारे,यश कासारे अतुल खरात,शेख राजू,वसीम शाहा, मोहम्मद उस्मान,असलम शाहा,शेख कासिम, मोहम्मद आसिफ, समीर खान, अश्पाक शहा, फिरोज खान, मुबारक खान, शहजाद खान,लतीफ भंडारी आदींची उपस्थिती होती.