Home यवतमाळ “प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात १७ मे ला यवतमाळ मध्ये” ,बुद्ध पौर्णिमेचे औचित्य...

“प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात १७ मे ला यवतमाळ मध्ये” ,बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधुन डॉ. निरज वाघमारे मित्रपरिवाराच्या वतीने बुद्ध जयंती पर्वाचे आयोजन

251
यवतमाळ – तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या २५८४व्या जयंतीनिमित्त आयोजित बुद्ध जयंती पर्वाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या बहारदार भीमगीतांची मेजवानी रसिकांना मिळणार असुन याचा सर्व भीमप्रेमी नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन डॉ.निरज वाघमारे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
यवतमाळ येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त डॉ.निरज वाघमारे मित्रपरिवाराच्या वतीने बुद्ध जयंती पर्वाचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये दिनांक १७मे रोज मंगळवार ला सायंकाळी ६वाजता नंदूरकर महाविद्यालयाच्या प्रांगणात तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र फेम महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांच्या बहारदार भिम गीताच्या कार्यक्रमाचे तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२२मान्यवर अध्यक्षांचा सत्कार सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा हे राहणार आहेत तरी सर्व बहुजन समाज बांधव ,माता भगिनी यांनी उपस्थित राहुन या कार्यकामाचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.निरज वाघमारे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.