माणुसकीच्या बँक बॅलन्स मध्ये गडगंज संपत्ती कमावली गर्भश्रीमंत शांतामाय !
……… आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार. तळपत्या उन्हात अन् रखरखत्या रानात राहिलीस ,माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात ,कधी मिळेल मुठभर घास, कधी घडेल तिला उपवास,. ओल्या मातीतून चालताना. उडविले काट्याचे भास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आकार आई महती सांगणारे हे शब्द तेव्हा कानावर पडतात तेव्हा जगातील प्रत्येक मुलाच्या डोळ्याच्या दोन्ही कडा ओल्या झाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच असे म्हणतात, जो पर्यंत आई आणि वडील जिवंत असतात तो पर्यंत आपल्यातले मूल जिवंत असतं. मग वय कितीही असो ! आपण कुणाचं तरी मूल असतो. आजच्या दिवशी ९ मे २०२२ला माझ्यातलं मूल मेलं. कारण ईश्वराने माझ्या आईला नेलं .माझी आई साधी भोळी,बोलकी , स्पष्टवक्ती , खंबीर आई ,तितकीच संसाराची काळजीवाहू ! संसाराचा गाडा खरं तर तिने एकटीनेच ओढला माझे बाबा म्हणजे भलामाणुस ,देवमाणूस. साधे भोळे गरिबीचं जीणं जगत असताना कधी कुणाला बोट दाखवायची संधी तिने दिली नाही. सत्तरीतल आयुष्य स्वाभीमानानं जगली. आम्ही देऊळगाव माळी गावात राहत असलो तरी नागझरी बु| नागझरी खु. शेवगा.जाहगिर गावातली वडलोपार्जीत बलुतेदारी करत तिने शेती कसली. २००६ सालीच शिर्डी येथे तिचं मोठं ऑपरेशन झालं होतं . तरी देखील भाऊबंदकीने नावे ठेवू नयेत म्हणून मोठ्या जिगरीने शेती ,कुंभारकी,बलूतेदारी काळ्या मातीचा चिखल तुडवीत बलूतेदारी जपण्यासाठी कुंभार काम करत संसाराला हातभार लावायची. इतर बायकांच्या बरोबरीनं शेतात राब राब राबायची. सोयाबिन सोंगायला आली की दिवसभर हात विळा घेऊन कंबर टोगळे प्रचंड दुखत असतांनासुद्धा सोयाबीन सोंगायची. दिवसभर कष्ट उपसून झाले की संध्याकाळी बसत उठत का होईना शेवगा शिवारातील आमच्या शेतापासुन चालत चालत देऊळगाव माळीत घरी पोहचायची. भ कुंभारवाड्यात येईपर्यंत थकलेली शिणलेली असायची. शिणलेली आई मग चिडचिड करी. लहानपणी आम्ही भावंडं घाबरून दूर सावध राहायचो..माझे वडिल चिडून म्हणायचे ,तुझी कंबर दुखत असतांना एवढं शिणायला आणि चिडायला होत असेल तर कशाला जाते मग वावरात ? दे सोडून सगळं ! आई शांतामाय मग अजून रागावे, वावर सोडून काय भावकीच्या समोर नाक कापून घेऊ ? आपुन वावरात राबता आहे म्हणून गाव विचारतंय ! नायतर कुणी कुत्रं विचारणार नसत आपल्याला गावात !” वडील कमालीचे शांत आहे ते आई चिडल्यावरतर वडिल एकदम शांत होत. त्यांना तिच्या जिगरबाज हिंमतबाज पणाचं भारी कौतूक वाटायचं. आम्हाला पण अभिमान वाटायचा ! दूसऱ्या दिवशी हाता-पायांना सूज येई. अंग ठसठस करी. वावरात आणि निंदन खुरपण प्रचंड मेहनत वर्षातील ठरावीक दिवसच करावी लागे. देऊळगाव माळीसारख्या खेडेगावात जगणाऱ्या दुखण्याने हैरान आईच्या शरीराला त्याची सवय झाली होती दुखन अंगावर काढायची मागच्या पंचवीस वर्षांपूर्वी पासुन ती सर्व दुखन अंगावर काढत असे. पण शिर्डीत ऑपरेशन झालेल्या शांतामायच शरीर मात्र कंबरेचा व टोंगळे दुखत त्रस्त होतं . चिखल तुडवुन गाडगिमडकी बनवल्या शिवाय गावात मानानं उभं राहता येणार नाही. हे तिचं जगण्याचं सुत्र होतं. त्यासाठी वाट्टेल तितके कष्ट उपसण्याची तिची तयारी होती. कालांतराने माझ्या वडिलांच्या गरिबीची दिवस बदलले मी पत्रकार झालो मी माझ्या डोळ्यांनी माझ्या आई चा वडिलांचा कुटुंब चालवण्यासाठी चा संघर्ष उघड्या डोळ्यांनी बघितला, काबाडकष्ट करून काबाडकष्ट करणाऱ्या माझ्या शांताबाई चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जिद्दीने कामाला लागलो आणि पाहता पाहता आमचे दिवस बदलले. आईच्या अपेक्षेप्रमाणे शेतात विहीर खणली शेतीची मोजणी केली शेतात शेड बांधले शेतात स्वतंत्र लाईन घेतली , आईच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे तिने केलेल्या कष्टाचं चीज झालं असं तिला असं वाटावं तो क्षण होता मुंबई येथे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीचा झालेला सत्कार, हा तिच्या आयुष्याला नवी उभारी देऊन गेला, ज्या कौलांच्या घराने आईला प्रचंड छळले ते घर मोडून भलामोठा बंगला आईच्या इच्छेखातर बांधला पण त्या विहिरीची आणि घराची उजळणी करण्या अगोदर च आई अर्धांग वायू आणि हृदयविकाराचा तीव्र धक्क्याच्या कैचीत सापडून नऊ मे ला आम्हाला आकस्मिक पणे सोडून गेली. ज्या घरासाठी जिवापाड राबली. त्या उभ्या राहिलेल्या घरात तिचं पाऊल पडलं पण त्या घराच्या उजळणी ला मात्र ती थांबली नाही. आणि देवाघरी गेली ! ह्या विचारानं काळजाला घरं पडतात. ईश्वरा तू माझ्या आईला लवकर नेलं . माझी तुझ्याविषयी तक्रार आहे आणि राहणारंच पण माझ्या आईला तुझ्या घरी सुखी ठेव . तिच्या आत्म्याला दगदग होऊन नको देऊ , हीच निर्मिका चरणी मागत असताना तिची जन्मापासून ची कहाणी मात्र अधुरी राहते ती अशी शिवनगीरी ता.मंठा जि.जालन येथील शेतकरी कोंडीबा काळे यांच्या घरात मोठा लाडात वाढलेली लाडकी लेक, परशुराम, तुकाराम हे दोन भाऊ शांता मुक्ता या दोन बहिणी ७५ सेक्टर पेक्षा जास्त शेती असलेला एक बाप आणि दोन आई यांच्या लाडात वाढलेली शांता वयाच्या पंधराव्या वर्षी देऊळगाव माळी सारख्या गावात साधारण परिस्थिती असलेल्या पण मनाने खुप श्रीमंत असलेल्या व “देवमाणूस” भलामाणुस म्हणून ज्यांना पंचक्रोशी ओळखतात अशा हरिभाऊ राऊत यांची पत्नी म्हणून सप्तपदीचे फेरे घेऊन स्वभावाने अतिशय कणखर ,जसे वरून टनक पण आतुन मऊ असलेल्या सासू स्व.कलाबाई राजाराम राऊत यांच्या सुन होते,त्या घरात आजी कलाबाई ,काका निंबाजी काकु कमलबाई,बाबा हरीभाऊ राहत असत ,ज्या सस्त्या सुकाळात अतिशय गरीब कुटुंबात आल्यानंतर ज्या वेळी एक वेळ जेवणाची भ्रांत होते तेव्हा होलग्याच्या भाकरी व तरूट्याच्या पाल्याची भाजी खाऊन दिवस काढले अशा परिस्थितीत पुर्वीचा राऊत परीवाराचा कुंभारकीचा बलुतेदारी चा व्यवसाय गाडगे ,मडकी,चुली, दिवाळीच्या पणत्या संक्रांतीचे खन, आखाजीच्या पिंग्या, पोळ्याचे बैल गळतीची डेरे, पावसाळ्यात झाडे लावायची कुंड्या ,दुधानं, आणि माती पासून ज्या ज्या वस्तू तयार होतात या दैनंदिन उपयोगात येतात अशा सर्व वस्तू नागझरी खुर्द असेल नागझरी बुद्रुक ,शेवगा जहागीर असेल आणि देऊळगाव माळी तील बहुसंख्य शेतकर्यांना वर्षभर मातीचे भांडे पुरवायचे आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडे पीठ, कूट,खळ,माघायच त्यावर कुटुंबाचा रहाटगाडगे चालत असताना अतिशय गरिबीच्या परिस्थितीत कौलारू चे घर त्या घराला असंख्य चांदण्यासारखे छिद्रे आणि पावसाळ्याच्या दिवसात त्या घरातून प्रत्येकी छिद्रातून पडणारे पाण्याचे टपटप थेंब आणि त्या प्रत्येक थेंबात खाली घरातील भांडीकुंडी लावण्याचा रात्रभर चाललेला शांताआई चा खटाटोप आम्हा भावंडांना चिल्यापिल्यांना फलट्या खाली झोपी घालून माझे वडिल रात्री बारा एक च्या दरम्यान डोक्यावर पोतो आणि हातात रॉकेलचा कंदिल घेऊन पाण्याचे थेंब नये म्हणुन कौलारू च्या घरावर दिवसभर माकडाने मारलेल्या माकड उड्यामुळे घसरलेल्या कौलारू ना व्यवस्थित लावण्यासाठी रात्रीच्या काळोखात काळ्याकुट्ट अंधारात माझे वडील हरिभाऊ राऊत जेव्हा रात्री सिडी चढून त्या घरावर जायचे तेव्हा मात्र माझी आई प्रचंड गरिबीच्या सोसलेल्या ञासाच्या झळा तिच्या चेहऱ्यावर दिसत असे ,ति प्रचंड गरीबी मुळे आम्हा भावंडांना तिचे अश्रुं दिसु नये म्हणुन अंधारात जाऊन रडत असे, हा माझ्या आईच्या व बाबाच्या संसारातील प्रचंड संघर्ष डोळ्यांनी बघितला त्यामुळेच बाल माझ्या बालमनावर अतिशय आखात करून गेले आणि तेव्हापासून मला वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत पावसाळ्यात पडलेला पाऊस हा मला कायम छळत होता करण माझी माय शांताबाई माझे वडील हरिभाऊ यांनी सोसलेल्या प्रचंड गरिबीच्या झळा मी वयाची तिशी पार करताना सुद्धा मला जाणवत होत्या, हे सगळे घडत असताना आम्हा दोन बहिणी आणि दोन भावंडांना स्वतः अशिक्षित असतानासुद्धा शाळेत जात नाही म्हणून मला मास्तराम पुढे वारंवार उभी करणारी माझी आई , बघितल्यावर असं वाटायचं ती स्वतः परिस्थिती शिकू शकली नाही परंतु मुले शिकली पाहिजे तेव्हाच परिस्थिती बदलेल या गोष्टीचा नितांत विश्वास होता तिच्यात असलेली शिक्षणाबद्दलची प्रचंड ओढ ही मला कायम प्रेरणादायी वाटायची माझे वडील अतिशय भोळेभाबडे असल्यामुळे संसाराच्या कुटुंबाचा प्रचंड भार तिने ओढला आणि सातत्याने वयाची 68 वर्ष पुर्ण होत असतानासुद्धा ति तर त्यांना कुटुंबाच्या हितासाठी ती झटत होती, हा सर्व संसाराचा गाडा पुढे नेत असताना नागझरी खुर्द आणि नागझरी बुद्रुक शेवगा जा. या तिन्ही अतिशय छोट्याशा खड्ड्यांमध्ये असलेल्या प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती सोबत अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जपत असतानाच नागझरी खुर्द येथील स्व.भगवान साहेब,स्व. रामसिंग गोलाईत,स्व.आश्रुजी पडोळे,स्व.लक्ष्मण पडोळे , स्व.रामभाऊ,सुरूशे,स्व. प्रल्हाद सुरूशेसर,स्व.आत्माराम काटे, स्व.मारोती संत, स्व.नारायण देवकर,स्व.श्रीराम देवकर,स्व.नारायण भोसले,स्व.हिम्मत भोसले,स्व.गणपत देवकर,शेवगा जहागीर येथील डॉ.विष्णु गिरी,स्व.राजाराम गिर्हे,स्व.विठोबा गिर्हे,स्व.ञ्यबंक गिर्हे,व तसेच स्व.हरिचंद गिरी असतील या सर्व परिवारातील ज्येष्ठ कर्तबगार लोकांच्या वागण्या-बोलण्यात कायम हरिभाऊ कुंभार आणि शांताबाई कुंभार नव्हे तर माझा संपूर्ण राऊत परिवार याबद्दल प्रचंड आस्था ,प्रेम जिव्हाळा ,आपुलकीचे दर्शन वारंवार माझ्या बालपणी घडले,लहानपणी नागझरी येथील काटे गुरुजी यांच्या जागेत माझं बालपण गेलं त्या गावातुन देऊळगाव माळी येथे ते जा करत वर्ग पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत असताना नागझरी गावापासून तीन किलोमीटर प्रवास केला त्या प्रवासात होणाऱ्या त्रासाबद्दल मी जेव्हा माझ्या आईला सांगायचो तेव्हा माझी आई एकच वाक्य नेहमी म्हणायची शिक्षण घेऊन माणूस मोठा होतो !मी शिकली नाही म्हणून मला संघर्ष करावा लागत आहे परंतु तिची शिक्षणा बद्दल असलेली तळमळ,मला कायम प्रेरणादायी वाटे, ती रात्रंदिवस कष्ट करायची माती चुरायची, घोड्याची लिद कुटायची,जमा करायची ,त्या मातिचे गोळे बनवायचे माझे वडिल त्या मातिला चाकावर त्या मठाला आकार द्यायचे आणि त्याला अतिशय उत्तम दर्जाच्या भट्टीतून भाजून काढायचे,आणि आई ते सर्व मातीचे भांडे खेड्यापाड्यात वाटप करून त्यातून मिळणाऱ्या पिट कुठातुन संसाराचा चालवायची. कुठल्याही प्रकारचे आर्थिक समीकरण जुळत नसतानासुद्धा फक्त दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू नये यासाठीच हा सर्व खटाटोप करत होती करत असताना तिने अतिशय नेटाने संसार उभा केला आणि लाख-मोलाची जिवाभावाची प्रेमाची आपुलकीची जिव्हाळ्याची माणसं कमावली,मी ज्या ज्या वेळीस पंचक्रोशीतील गावात जातो तिथला प्रत्येक व्यक्ती मला हेच बोलतो कैलास कुंभार मामा मामीची तब्येत कशी आहे त्यांची काळजी घे त्यांनी खूप कष्ट केले की वाक्य माझ्या मनावर कायम घर करतात, शब्द कायम त्यांच्या संघर्षाची पावती मला देतात परंतु आयुष्याच्या संघर्ष करत असताना शांतामाय गावातील कुठल्याही लग्नसमारंभात, दुःख सुखात सहभागी व्हायची तसेच संस्कार माझ्यावर केले परंतु ती मला वारंवार सांगायचे बाळा पेरल्यानंतर उगवते हा तिचा जीवन जगण्याचा मूलमंत्र होता, आई ने दिलेली ही शिकवण मला कायम समाजसेवेसाठी प्रवृत्त करते! आणि सातत्याने कुटुंब सांभाळत असताना सुद्धा समाजसेवेचे व्रत मी सातत्याने काल आज आणि उद्या ही जपत राहणार आहे , आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जपत राहिला, माझ्या आईचा मोठा आवाज हा अनेक अपरिचित लोकांना वेगळा वाटायचा परंतु तिच्या आवाजात एक प्रकारचा गोडवा होता ती मला नेहमी म्हणायची की माझा आवाज शेवटपर्यंत असणार, खरं तर जगात आपण असंख्य प्रकारच्या डिग्री घेतल्या परंतु आपल्याला समाजातील माणसासोबत कसं राहायचं हे जर माहित नसेल तर आपल्या डिग्री फील आहेत परंतु त्याच्या अगदी विरुद्ध माझी आई एकही वर्ग न शिकता शिक्षणाबद्दल अतिशय प्रचंड आस्था असलेली माझी आई आम्हा भावंडांना शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन द्यायची , एखाद्या व्यक्तीची श्रीमंती मोजायची असेल, तर त्या व्यक्तीच्या बँकेचे खाते चेक न करता त्या व्यक्तीच्या दारात दररोज किती चपला जोडे असतात यावरून ती श्रीमंती मोजता येतील अगदी त्याप्रमाणेच माझ्या घरी कायम माणसांचा राबता राहतो अनेक लोक भेटायला येतात त्यातून माझ्या आईला कायम आनंद व्हायचा अशा जगावेगळ्या माझी आईला संसार चालत असताना अचानक ईश्वराने माझ्यावर अन्याय करून दिनांक 9 मे २०२२रोजी निर्मीकाने माझी आई माझ्याकडुन हिरावून घेतली त्याबद्दल माझी विधात्याकडे कायम तक्रार असणारच आहे परंतु आपल्या प्रेमळ स्वभावामुळे तिने लाख मोलाची माणुसकी संपन्न माणसं कमवली हीच माझ्यासाठी शिदोरी आयुष्याभर कायम असेल सदैव, मला समाजसेवेसाठी प्रेरित करणारी माझीआई स्वर्गीय शांतामाय राऊत हिला भावपूर्ण श्रद्धांजली…………………………..
कैलास राऊत पत्रकार. देऊळगाव माळी ता.मेहकर जि.बुलढाणा.9561596693