Home मराठवाडा खडका सोसायटीवर ग्राम विकास पॅनलने मारली बाजी…

खडका सोसायटीवर ग्राम विकास पॅनलने मारली बाजी…

347

 

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील खडका- खडकावाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादीत खडका अंतर्गत २०२२-२३ ते २०२७-२८ करिता संचालक मंडळाची निवडणूक पार पडली असून सोसायटी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने दणदणीत विजय मिळविला आहे.या निवडणूकीत या पॅनलचे सर्वच्या सर्व १३उमेदवार निवडून आले आहेत.

सोसायटी निवडणूक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गाव अंतर्गत गटाच्या ताकदीचे शक्तीप्रदर्शन समजले जात आहे.पॅनल प्रमुख जयमंगल जाधव यांच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवून सोसायटी निवडणूकीत विजय मिळाला आहे.सर्वसाधारण गटातून गोवर्धन जाधव,गणेश जाधव,दिलीप जाधव,दत्ता जाधव,पाटीलबा जाधव,पुरूषोत्तम जाधव,बाबूराव जाधव,महीला राखीव गटातून मिनाक्षी जाधव, शोभा जाधव तर अनुसुचित जाती जमाती गटातून अर्जुन गवळी यांंचा विजय झाला आहे.शामराव जाधव,आण्णासाहेब जाधव,भिमराव जाधव,शरद जाधव,शे.आब्बास,सरपंच जफर पटेल,गुलाब अहमद पटेल,शब्बीर पठाण,ईसाक पटेल,एकबाल शेख,राजू पटेल,नाजेर पटेल,यांनी परिश्रम घेतले आहे. पालकमंत्री राजेश टोपे यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले आहे.